Rape Case Acquittal Dainik Gomantak
गोवा

Rape Case Acquittal: 'अयशस्वी प्रेमसंबंध म्हणजे बलात्कार नव्हे'; लग्नाचे आमिष दाखविल्याच्या आरोपातून युवक निर्दोष

Criminal Case Judgment: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याच्या आणि फसवणुकीच्या आरोपातून ताळगाव येथील ३५ वर्षीय युवकाची पणजीतील जलदगती विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याच्या आणि फसवणुकीच्या आरोपातून ताळगाव येथील ३५ वर्षीय युवकाची पणजीतील जलदगती विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

अयशस्वी प्रेमसंबंध म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्कार ठरत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. जून २०२३ ते जानेवारी २०२४ या काळात कांदोळी आणि ताळगाव येथे लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार युवतीने केली होती.

याप्रकरणी बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, उलटतपासणीत युवतीने कौटुंबिक दबावामुळे आपणच लग्नास नकार दिल्याचे मान्य केले. आरोपीविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगत तडजोड अर्जही सादर केला. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता न आल्याने न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa International Sports City: गोव्यात 3 हजार कोटींचे आंतरराष्ट्रीय क्रीडा शहर; युरोपातील रिवार समूहाशी करार, 3 हजार रोजगारांची अपेक्षा

IND vs NZ: न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडियाने रचला इतिहास! 720 धावा ठोकत कसोटी क्रिकेटमध्ये केला महाविक्रम; 16 वर्षांनंतर मोडला स्वतःचाच रेकॉर्ड

Karapur Mega Project: कारापुरात वादग्रस्त प्रकल्प नकोच; अभिजित दीपके यांची ठाम भूमिका, गौरेश घाडींना संरक्षण देण्याची मागणी

Goa Voter List Deletion: गोव्यात 35 हजार मतदारांची नावे यादीत नसल्याचा काँग्रेसचा दावा; वगळलेल्यांना मदतीचा हात देणार

Cyber Crime: 'दहशतवाद्यांना दीड कोटी पाठवले', एटीएस अधिकारी बनून सायबर ठगांनी साधला डाव; 'डिजिटल अरेस्ट'च्या प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT