यंदा महामारीच्या निर्बंधात शिथिलता आल्याने काही कारागिरांनी यंदा गोव्याची (Goa) वाट धरली आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: कोरोनामुळे वाद्ये दुरुस्ती व्यवसायात मंदी, कारगिरांकडून खंत

वर्षाच्या खंडानंतर (After a one-year break) महाराष्ट्रातील वाद्य दुरुस्ती कारागीर साखळी शहरात, या व्यवसायाला 25 टक्केही प्रतिसाद मिळालेला नाही. यंदा व्यवसायावर (business) परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून अन्य कारागीरांना सोबत आणले नाही.

दैनिक गोमन्तक

डिचोली: गणरायाच्या आगमनाला अवघेच दिवस बाकी असल्याने सध्या सर्वत्र चतुर्थीची तयारी सुरु झाली आहे. एक वर्षाच्या खंडानंतर (After a one-year break) चतुर्थीनिमित्त महाराष्ट्रातील (Maharashtra) काही पारंपरिक चर्मवाद्ये दुरुस्ती कारागीरही सध्या गोव्यात आले आहेत. 'कोविड' (Covid-19) महामारीमुळे गेल्यावर्षी चतुर्थी काळात महाराष्ट्रातील या कारागिरांना गोव्यात येणे शक्य झाले नव्हते. मात्र यंदा महामारीच्या निर्बंधात शिथिलता आल्याने काही कारागिरांनी यंदा गोव्याची (Goa) वाट धरली आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर येथील नागनाथ भोसले हे वाद्य दुरुस्ती (Instrumental repair) कारागिर सध्या डिचोली तालुक्यातील साखळी शहरात आले आहेत.

बाजार परिसरात भाड्याची जागा घेवून मुलगा संतोष यांच्या मदतीने वाद्ये दुरुस्ती करताना ते दिसून येत आहेत. चतुर्थी काळात भजन, आरतीसाठी लागणाऱ्या घुमट, तबला, पखवाज आदी चर्मवाद्यांची सध्या गणेशभक्तांकडून दुरुस्ती आणि जमवाजमाव सुरु असली, तरी 'कोविड" महामारीच्या पार्श्वभूमीवर अजूनही अपेक्षेप्रमाणेवाद्य खरेदी वा दुरुस्तीसाठी प्रतिसाद असल्याचे दिसून येत नाही. एकाबाजूने गेल्यावर्षी वाद्य दुरुस्ती व्यवसाय संकटात आला होता. यंदाही या व्यवसायाला फटका बसण्याचे संकेत मिळत आहेत. यंदाही चर्मवाद्ये दुरुस्ती व्यवसायावर परिणाम होणार असल्याची खंत पंढरपूर येथील चर्मवाद्य दुरुस्ती कारागीर नागनाथ भोसले यांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी चतुर्थीला साधारण दोन महिने असताना महाराष्ट्रातील पंढरपूर आदी काही भागातील पारंपरिक चर्मवाद्ये दुरुस्ती करणारे कलाकार गोव्यातील विविध भागात येवून वाद्ये दुरुस्ती करीत असतात. 'कोविड' महामारीमुळे मागीलवर्षी महाराष्ट्रातील कारागीरांना गोव्यात येणे शक्य झाले नव्हते. यंदाही साधारण तशीच परिस्थिती असली, तरी काही कारागीर गोव्यात आले आहेत. पंढरपूर येथील नागनाथ भोसले हे कारागीर यंदा साखळीत वाद्ये दुरुस्ती करताना दिसून येत आहेत. वाद्ये दुरुस्ती हा आमचा पिढीजात व्यवसाय असून, गेल्यावर्षीचा अपवाद वगळता जवळपास पंधरा वर्षांपासून दरवर्षी चतुर्थीला साधारण दोन महिने असताना आपण साखळी शहरात येत असल्याचे त्यांनी सांगितले. चर्मवाद्ये दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य सोलापूर येथून उपलब्ध होत असते. अशी माहिती त्यांनी दिली.

भजन, आरत्यांवर निर्बंध

चतुर्थी म्हटली, की सर्वत्र भजन आरत्यांचा निनाद घुमू लागतो. भजन आरत्या म्हटल्यावर घुमट, समेळ, तबला, पखवाज ही वाद्ये आलीच. चतुर्थीकाळात वाद्यांची दुरुस्ती आणि नवीन वाद्ये खरेदीसाठी गणेशभक्तांची लगबग सुरु असते. मात्र 'कोविड' महामारीमुळे गेल्यावर्षीपासून भजन, आरत्यांवर निर्बंध आले आहेत. स्पर्धांच्या आयोजनावरही निर्बंध आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीपासून वाद्ये खरेदी आणि दुरुस्तीचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.

व्यवसायावर परिणाम

यापुर्वी आपण साखळीत आलो की, सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात वाद्ये दुरुस्तीसाठी यायची. यंदा क्वचितच गणेशभक्त वाद्ये दुरुस्तीसाठी घेवून येत आहेत. यापुर्वीचा या व्यवसायातील अनुभव पाहता, आतापर्यंत या व्यवसायाला 25 टक्केही प्रतिसाद मिळालेला नाही. यंदा व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून अन्य कारागीरांना सोबत आणले नाही.

-नागनाथ भोसले, कारागीर, पंढरपूर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT