Goa Taxi Service Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Service: ‘सहकार’च्या 53 योजनांना ‘बूस्ट’! गोमंतकीय जनतेला मिळणार लाभ; सहकार टॅक्‍सी सेवेबाबतही स्‍थानिकांशी चर्चा सुरु

Cooperation Ministry Schemes: सहकार मंत्रालयाच्‍या सहकार्यातून राज्‍यात ‘सहकार टॅक्‍सी सेवा’ सुरू करण्‍याचे प्रयत्‍न खात्‍याकडून सुरू आहे.

Sameer Panditrao

पणजी: सहकार मंत्रालयाच्‍या सुमारे ५३ योजना राज्‍यातील विविध सरकारी खात्‍यांपर्यंत पोहोचवून त्‍यांचा जनतेला लाभ मिळवून देण्‍याचा निर्णय सहकार खात्‍याने घेतला आहे. त्‍यासाठी आतापर्यंत मत्‍स्‍योद्योग, कृषी, जलसंपदा, ग्रामविकास, पशुपालन आणि पशुसंवर्धन, पंचायत आदी खात्‍यांना एका छताखाली आणल्‍याची माहिती सहकार निबंधक आशुतोष आपटे यांनी मंगळवारी ‘गोमन्‍तक’ला दिली.

‘सहकारातून समृद्धी’ हे ब्रीद घेऊन स्‍थापन केलेल्‍या सहकार मंत्रालयाने राज्‍यांसाठी विविध योजना सुरू केल्‍या आहेत. जनतेला या योजनांचा लाभ देऊन सहकाराच्‍या माध्‍यमातून समृद्धीकडे नेण्‍याचे निर्देशही केंद्र सरकारने (Central Government) दिले आहेत. परंतु, या मंत्रालयाच्‍या अनेक योजना राज्‍यांत पोहोचल्‍या नव्‍हत्‍या.

या सर्व योजना राज्‍यात आणून सरकारच्‍या संबंधित खात्‍यांमार्फत त्‍या जनतेपर्यंत पोहोचवण्‍याचा निर्णय घेत, सहकार खात्‍याने गेल्‍या काही महिन्‍यांपासून त्‍याबाबतचे प्रयत्‍नही सुरू केले होते. या प्रयत्‍नांना यश मिळाले असून, गोव्‍यातील (Goa) जनतेच्‍या विकासासाठी विविध प्रकारच्‍या ५३ योजना सुरू करण्‍याचा निर्णय खात्‍याने घेतला असल्‍याचे आपटे यांनी सांगितले.

नागरिकांनी संघटित होऊन सहकारी सोसायट्या स्‍थापन केल्‍यानंतर त्‍यांना या योजनांचा लाभ घेता येईल. त्‍यानंतर त्‍यांना हव्‍या क्षेत्रात सहकारी तत्त्‍वावर विविध प्रकल्‍प स्‍थापन करून त्‍याचा लाभ जनतेला देता येईल. त्‍यासाठी संबंधित खात्‍यांनी पुढाकार घ्‍यावा, यासाठी त्‍यांच्‍याशी बैठका सुरू आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले.

सहकार टॅक्‍सी सेवेबाबत चर्चा सुरू

सहकार मंत्रालयाच्‍या सहकार्यातून राज्‍यात ‘सहकार टॅक्‍सी सेवा’ सुरू करण्‍याचे प्रयत्‍न खात्‍याकडून सुरू आहे. त्‍यासाठी स्‍थानिकांशी चर्चाही सुरू आहे. काहीजणांना एकत्र आणून, सोसायटी स्‍थापन करून राज्‍यात ही सेवा सुरू करण्‍यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

Goa Politics: "एकटा लढेन, मागे फिरणार नाही",पक्ष तिकीट न मिळाल्यास 'स्वतंत्र' लढणार; डॉ. केतन भाटीकर यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT