Margao  Dainik Gomantak
गोवा

Margao News : राज्यातील शांतता नष्ट करण्याचा काहींचा कट

Margao News : सर्वच वक्त्यांनी कुणाचेही नाव घेता, अशा शक्तींचा मुकाबला करण्यासाठी गावकऱ्यांनी एकोपा जपण्याची गरज व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

मडगाव, राज्यात सर्व धर्मीयांमध्ये असलेली शांतता बिघडविण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न सध्या काही शक्ती करत असून दोन दिवसांपूर्वी सां जुझे द आरीयाल येथे जे काय तो त्याच कटाचा एक भाग आहे, असा आरोप आज पाद्रीभाट येथे आयोजित सभेत करण्यात आला.

सर्वच वक्त्यांनी कुणाचेही नाव घेता, अशा शक्तींचा मुकाबला करण्यासाठी गावकऱ्यांनी एकोपा जपण्याची गरज व्यक्त केली.

सां जुझे द आरीयाल गावात शिवाजी महाराज पुतळा अनावरण वादानंतर २० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदण्यात आला होता.

त्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण गाव ज्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे,त्यांच्यासोबत आहे हे, दाखविण्यासाठी ही सभा बोलावली होती. यावेळी समर्थनार्थ मेणबत्ती मोर्चा काढला. झटापटीत जखमी कार्यकर्ते फ्रेडी त्रावासो हेही सहभागी झाले होते.

चर्चचे पाद्री दामासियान कार्व्हाल्हो यांनी कुणाचेही नाव न घेता म्हणाले,की काही शक्ती या शांतता बिघडवू पहात असून काही मंत्रीही पाठिंबा देताहेत.

लोकांनी संयम सोडू नये. ग्रामस्थांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत. मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत आपण चर्चा केली आहे.

- क्रुझ सिल्वा, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT