Goa: एसटी आरक्षण! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शिष्टमंडळासह घेणार गृहमंत्री अमित शहांची भेट

गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एसटी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी वेळ घेतल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
Goa ST Political Reservation | CM Pramod Sawant | Amit Shah
Goa ST Political Reservation | CM Pramod Sawant | Amit ShahDainik Gomantak
Published on
Updated on

Goa ST Political Reservation

गोव्यातील अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एसटी समाजाच्या नेत्यांनी आज (गुरुवारी) याबाबत आक्रमक भूमिका घेत अधिसूचना जारी करण्याची मागणी केली, तसेच येत्या सात दिवसांत सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करु असा इशारा दिला.

दरम्यान, अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शुक्रवारी (दि.23) शिष्टमंडळासह गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत जाणाऱ्या शिष्टमंडळात सभापती रमेश तवडकर, मंत्री गोविंद गावडे, आमदार अँथनी वाझ यांच्यासह इतर एसटी नेत्यांचा समावेश आहे.

गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एसटी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी वेळ घेतल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता दिल्लीत शहांची भेट होणार असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

Goa ST Political Reservation | CM Pramod Sawant | Amit Shah
Busy Airport List: मोपाचा दाबोळीला फटका; व्यस्त विमानतळाच्या यादीत गोव्याला मागे टाकत जयपूर दहाव्या स्थानी

अनुसूचित जमातींसाठी विधानसभेत चार मतदारसंघ राखीव ठेवण्याबाबत अधिसूचना काढण्यासाठी एसटी समाजातील नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आलीय.

सरकारने प्रतिसाद न दिल्यास लोकसभा निवडणुकीबाबत भूमिक ठरविण्यासाठी आदिवासी पंचायत घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचा इशार एसटी समाजाने दिला.

दरम्यान, शुक्रवारी शहांची भेट घेणार असल्याचे माहिती असल्याने काही एसटी नेत्यांची शोबाजी सुरु असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant On Konkan
Goa Temple Tourism
home minister amit shah reviews goa st reservation file
Amit Shah Smart Border Model Plan
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com