Goa Congress | Amit Patkar
Goa Congress | Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification: लक्षात आहे ना? अपात्रता याचिकेबाबत अमित पाटकरांचे सभापतींना स्मरणपत्र

Pramod Yadav

MLA Disqualification

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांना पत्र लिहून सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांविरुद्धच्या प्रलंबित अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्याची मागणी केली.

14 सप्टेंबर 2022 रोजी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आठ आमदारांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या 6 डिसेंबर 2022 रोजीच्या प्रलंबित अपात्रतेच्या याचिकेकडे मी तुमचे लक्ष वेधून घेतो आणि तुम्ही त्यावर कालबद्ध पद्धतीने निर्णय घ्यावा अशी मागणी करतो, असे अमित पाटकर यांनी पत्रात म्हटले आहे.

पत्रात मायकल लोबो आणि दिगंबर कामत या दोन आमदारांविरुद्ध सभापतींनी नुकत्याच निकाली काढलेल्या याचिकेचाही उल्लेख आहे. ही याचिका यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनीच दाखल केली होती.

भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीचे उल्लंघन केल्याबद्दल मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस, दिलायला लोबो, राजेश फळदेसाई आणि केदार नाईक यांना अपात्र ठरवण्यासाठीची याचिका काँग्रेस अध्यक्षांनी डिसेंबर 2022 मध्ये गोवा विधानसभेच्या सभापतीकडे दाखल केली होती.

सभापतीनी त्यांच्यासमोर प्रलंबित असलेल्या याचिकेवर निर्णय घेण्यास विलंब केल्यास मी इतर सर्व कायदेशीर पर्याय शोधून काढेन, असे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आठ आमदारांनी सप्टेंबर 2022 मध्ये पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी सर्व आठ आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली होती जी गेल्या 17 महिन्यांपासून सभापतींसमोर प्रलंबित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News : ‘कल्‍की’मध्‍ये चमकतोय गोमंतकीय ‘ध्रुव’ तारा; छोडी पण महत्वपूर्ण भूमिका

Vijay Sardesai : विजय सरदेसाई यांनी ऐकली काणकोणवासीयांची गाऱ्हाणी

Mapusa Municipal Market : म्हापशात भिकाऱ्यांमध्ये वाढ; समस्या सोडवण्याची मागणी

DGP Jaspal Singh : डीजीपींची खुर्ची अस्थिर, बिश्णोईंकडे देणार ताबा

Goa Weather Update : राज्यात पाऊस @ ३५ इंच; सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक

SCROLL FOR NEXT