Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : भाजप सरकार कोकणी लेखकांची फसवणूक करतंय : अमरनाथ पणजीकर

गोवा कोकणी अकादमीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी : पणजीकर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : सरकारने गोवा कोकणी अकादमीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच नवा अध्यक्ष नेमावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विल्मा फेर्नांडीस, केनिशा मिनेझीस व महेश नादार उपस्थित होते.

भाजप सरकार कोकणी लेखकांची फसवणूक करत असून नवोदित लेखकांना योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवत असल्याचाही आरोप केला.

"कोकणी भाषेच्या प्रगतीसाठी, तिच्या विकासासाठी काँग्रेसचे योगदान आहे. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रयत्नाने आमची मातृभाषा कोकणी भारतीय संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली. आपल्याला घटकराज्याचा दर्जाही मिळाला. पण आता कोकणी अकादमीवर सुरू असलेले राजकारण पाहून दुःख होत आहे,” असे पणजीकर म्हणाले.

“राज्याच्या सर्व इच्छूक वाचकांपर्यंत कोकणी साहित्य पोहोचेल पाहिजे याची आम्ही काळजी घेतली म्हणूनच माजी खासदार स्वर्गीय शांताराम नाईक यांनी मोबाईल व्हॅन लायब्ररी कोकणी अकादमीला दान केली. पण हे सरकार ते वाचनालय सांभाळण्यात आणि गोव्याच्या कानाकोपऱ्यात हे वाचनालय नेण्यात अपयशी ठरले,’ अशी खंत पणजीकर यांनी व्यक्त केली.

भाजप सरकारने कोकणी भाषेच्या उन्नतीसाठी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत आणि कोकणी भवन बांधून त्याच इमारतीत अकादमीला स्थान द्यावे" असे आवाहन पणजीकर यांनी सरकारला केले.

अकादमीच्या अध्यक्षपदी अरुण साखरदांडे यांचा कार्यकाळ जानेवारीत संपला असला तरी नवीन अध्यक्षाची नियुक्ती करण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल पणजीकर यांनी आश्चर्य व्यक्त केले.

"जोपर्यंत नवीन अध्यक्षाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत नवीन समिती आणि योजना कशा सुरू होतील,” असा सवाल त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT