Goa Congress Dainik Gomantak
गोवा

ZP Election: पराभवानंतर काँग्रेसची चिंतन बैठक; आलेमाव,पाटकर उपस्थित

जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीवर घेतला आढावा

दैनिक गोमन्तक

मडगाव: दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर आणि विधीमंडळ गटनेते युरी आलेमाव, वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख यांनी दवर्ली जिल्हा पंचायत पोट निवडणुकांचे काँग्रेस उमेदवार लिओनसियो रायकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूक निकाल आढावा बैठक घेतली.

(Goa Congress review meeting held after failure in Zilla Panchayat by-election)

या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी काँग्रेस पक्ष तळागाळात मजबूत करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे असे सांगितले. तर आम्ही कुठ्ठाळी जिल्हा पंचायत उमेदवार वेलेंट बार्बोसा आणि कुठ्ठाळी मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांनाही भेटलो आणि निकालांचा आढावा घेतला. आम्ही त्वरित पाऊले उचलून काँग्रेस मजबूत करण्यासाठी सुधारात्मक उपाय करू असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

या बैठकांना सरचिटणीस सुभाष फळदेसाई आणि प्रदिप नाईक, कॅप्टन विरिएटो फर्नांडिस, ओलेन्सियो सिमोयस, एव्हरसन वालीस, ऑर्विल दौराद रॉड्रिग्स, सुकूर, पीटर डिसोझा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर गोवा काँग्रेस उपाध्यक्ष एम के शेख म्हणाले की, आम्ही एकंदर आढावा घेतला असून पुन्हा काम सुरू करू. आवश्यक ते निर्णय घेवून योग्य पाऊले उचलण्याचा आणि उणीवा दूर करु असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT