वास्को: मत्स्यव्यवसाय विभागाने आज बुधवारी (दि.19) सकाळी वास्को खारीवाडा येथील मच्छिमारी जेटी सील केल्याने मच्छिमारी व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली. सील करण्यास आलेल्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकारी वर्गाला मच्छिमारी व्यावसायिकांनी धारेवर धरले. जेटी उघडण्याचे आदेश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यानंतर जेटी दुपारी उघडण्यात आली.
(Goa Fisheries Department on Wednesday sealed three fishing jetties in the state )
मत्स्यव्यवसाय विभागाने बुधवारी राज्यातील तीन मासेमारी जेटी सील केल्या. विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, ज्या व्यापाऱ्यांनी विभागाकडे नोंदणी केली आहे, त्यांनाच जेट्टीच्या आत प्रवेश दिला जाईल. मत्स्यव्यवसाय विभागाने राज्यातील कुटबन, पणजी आणि वास्को खारीवाडा येथील मच्छिमारी जेटी जवळ पोलिस तैनात करुन सील करण्यात आल्या.
व्यवसायिकांची तारांबळ उडाली
मत्स्यव्यवसाय विभागाने घेतलेल्या या पवित्र्याने मत्सव्यवसायिक सैरभेर झाले होते. सकाळी 8.30 वा जेटीच्या मुख्य दरवाजावर पोलिस तैनात करण्यात आले. त्यामुळे सकाळी जेटीवरून मासे घेऊन जाणाऱ्या गाड्या आत मध्येच राहील्या. तसेच बाहेरून जेटीवर मासे घेऊन येणारी वाहने बाहेरच अडवून ठेवण्यात आल्याने मच्छिमारी व्यवसायिकांची तारांबळ उडाली.
कुटबण, पणजी आणि वास्को जेटीवर जे व्यवासायिक व्यवसाय करतात त्यांच्याकडे परवाना नाही, त्यांची थकबाकी आहे, हे कारण पुढे करून आज या तिन्ही जेटी सिल करण्यात आल्या. जेटी सिल करून त्यांचे मासे घेऊन जाणारे ट्रक अडविण्यात आले. दरम्यान सकाळी 8.30 वाजता पोलिस तैनात करून सील करण्यात आलेली जेटी दुपारपर्यंत उघडण्यात आली नसल्याने बाहेर जाणारी मासे तसेच ट्रकमध्ये राहीले.
बुधवारी सकाळी वास्को खारीवाडा येथील मच्छिमारी जेटीवर अचानक राज्य मत्स्यव्यवसाय विभागाने येऊन सील करणे एकदम चुकीचे असून, हे कृत्य सरकारला शोभत नसल्याची माहिती गोवा मच्छिमार मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी दिली. सरकारने वास्को खारीवाडा जेटीवर गांभिर्याने विचार करून नवीन जेटी बांधण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही.असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.
सद्या वास्को खारीवाडा जेटीवर 250 मच्छिमार बोटी असून यातील फक्त 12 किंवा 15 बोटी जेटीवर नांगरून ठेवता येतात. इतर बोटी बाहेर समुद्रात ठेवल्याने बोटमधील मासळी खराब होऊन आम्हाला नुकसान सोसावे लागते. तसेच आम्ही मासळी व्यवसायिक आहोत, व्यापारी नाही. याची सर्वप्रथम राज्य सरकारने पाहावे सरळ येऊन मच्छिमार जेटी बंद करणे सरकारला शोभत नसल्याचे अध्यक्ष डिसोझा म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.