Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar: आमदारांनी बदलली भूमिका, सरकारचा खरा चेहरा उघड; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा दावा

Goa Congress Press Conference: अधिवेशनात एनईपी व दाबोळी विमानतळाच्या मुद्दे चर्चेला यायचे आहेत, या विषयावरून विरोधी आमदार सरकारला उघडे पाडतील

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांत एसटी समाजाविषयी सरकारची जी काही भूमिका आहे, ती भाजपने दाखवून दिली आहे. विरोधात असताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे दृष्टी कंपनी विरोधात बोलत होते, किनारा स्वच्छतेवर भ्रष्टाचाराचा आरोप करीत होते. मात्र, भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यावर बोलण्याचेच टाळले, यातून त्यांचा खरा चेहरा उघड होत आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी वीरेंद्र शिरोडकर व मीडिया सेल प्रमुख अमरनाथ पणजीकर यांची उपस्थिती होती. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पर्यटन मंत्री खवंटे यांच्या बदलेल्या भूमिकेचा पर्दाफाश केला, असे पाटकर पुढे म्हणाले.

पाटकर म्हणाले की, अधिवेशनाच्या दोन दिवस प्रश्‍नोत्तर तासाचे कामकाज होऊ न देण्याचे काम भाजप सरकारने केले. या अधिवेशनात एनईपी (नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण) व दाबोळी विमानतळाच्या मुद्दे चर्चेला यायचे आहेत. या विषयावरून विरोधी पक्षाचे आमदार सरकारला उघडे पाडतील.

सभागृहातील प्रश्नांवर आणि मुद्यांवर मुख्यमंत्री अजिबात गंभीर नाहीत. प्रत्येक गोष्ट हसण्यावारी घेऊन जाणे मुख्यमंत्र्यांनी कृपा करून बंद करावे, असा सल्ला पाटकर यांनी यावेळी दिला आहे.

विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी राज्यातील आरोग्य खात्याची स्थिती जनतेसमोर आणली. यापुढेही इतर खात्यांची स्थिती समोर येणार आहे, असेही पाटकर यांनी नमूद केले.

मोपा लिंक रोडमध्ये मोठा घोटाळा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते मोपा लिंक रोडचे उद्‍घाटन झाले, पण डीबोट (डिझायन, बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्स्फर) तत्त्वावरील या विमानतळाच्या मुख्य आराखड्यात या लिंक रोडचा समावेश का नाही, असा प्रश्‍न पाटकर यांनी उपस्थित केला. तसेच या रस्त्यासाठी सुरू केलेला टोल बंद करावा, अशी मागणीही त्यांनी केली. या लिंक रोड ३५० कोटी खर्च केला आहे, मात्र त्यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

तो तोटा कसा झाला?

पाटकर म्हणाले, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो हे गोवा माईल्सचे मार्केटिंग ऑफिसर किंवा पीआरओ म्हणून बोलतात की काय, असे वाटते. गोव्यातील टॅक्सीधारकांमुळे ५०० कोटींचा तोटा झाला, असे वाहतूक मंत्री सांगतात. तो तोटा कसा झाला? लहान लोकांचे सरकारला काहीच पडलेले नाही, असे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT