Amit Patkar News | Goa Congress News Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar : मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा!

गोव्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असल्याचा अमित पाटकरांचा निशाणा

गोमन्तक डिजिटल टीम

Amit Patkar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना घडल्या, त्या पाहता राज्यात सरकार नाही, तर जंगलराज आहे, असे वाटते. राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतःच्याच विश्‍वात मग्न आहेत. बंदी असूनही राज्यात बेकायदा रेती व्यवसाय चालतो. याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली. काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत एल्विस गोम्स, विरिएतो फर्नांडिस, संजय बर्डे, सिमोईस आदी उपस्थित होते.

पाटकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांत सोनाली फोगट, ॲलन डिसोझा यांचा मृत्यू, काही दिवसांपूर्वी गायब झालेल्या मोहम्मद आगा याचा मृतदेह नदीत सापडणे किंवा कुडचडेत गोळीबार यातून काय स्पष्ट होते? बेकायदा रेती व्यवसायप्रकरणी 379 अन्वये केवळ पाचजणांनाच अटक कशी? खुद्द पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात हे बेकायदेशीर काम कसे? चतुर्थीच्या काळात शूट आऊटसारख्या घटना घडत आहेत. वाळू माफिया राज्याला गँग ऑफ वासेपूर करून टाकतील, अशी भीती पाटकर यांनी व्यक्त केली.

केंद्रातील एका मंत्र्यांनी गोव्यात येऊन हे राज्य कॅसिनोची राजधानी होईल, असे सांगितल्यानंतर गोव्याची बरीच बदनामी झाली. आता गोव्याला ‘मर्डर कॅपिटल’ असे नाव पडल्याचा आरोप विरिएतो फर्नांडिस यांनी केला. गोम्स म्हणाले की, सर्व यंत्रणा हातात असतानाही गोळीबार प्रकरणाचा तपास योग्य रितीने होत नाही. सोनाली फोगट यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे जाहीर करता आणि कुटुंबाने आरोप केल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंद होतो, यातून गोव्याची प्रतिमा वाईट बनत चालल्याचे गोम्स म्हणाले.

सण उत्सवांत शांतता भंग

राज्यातील गुन्हेगारी प्रकरणांची वाढती तीव्रता पाहता गुन्हेगारी घटकांवर सरकारचे खासकरून सरकारी यंत्रणांचे नियंत्रण राहिले नसल्याचे स्पष्ट होते. सणासुदीच्या काळातही जनता दहशतीच्या तणावाखाली वावरत आहे, अशी टीका पाटकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT