goa congress President Amit Patkar detained  Dainik Gomantak
गोवा

Amit Shah In Goa: शहांच्या सभेपूर्वी काँग्रेस नेत्यांना अटक

सभेला जाणारी वाहने अडविले; पाटकर पोलिस स्थानकात

दैनिक गोमन्तक डिजिटल

Amit Shah In Goa: म्हादईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानाचा निषेध व निदर्शने करण्यासाठी काँग्रेसचे नेते फर्मागुढी येथे सभेच्या ठिकाणी जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह इतर अनेक नेते व कार्यकर्त्यांना विविध भागातून प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली.

तर काहींना ते असलेल्या ठिकाणीच स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. अमित शहांच्या सभेवेळी कोणतेही गालबोट लागू नये, याकरिता खबरदारी घेण्यात आली.

फोंड्यामध्ये निदर्शने

पोलिसांनी कोणतेही आंदोलन होऊ नयेत म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, काहींनी फोंडा येथील बसस्थानकावर काळा झेंडा दाखवून शहांच्या गोव्यातील आगमनाचा निषेध करत निदर्शने केली. यामध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह इतरांचा समावेश होता.

पोलिसांनी कोणतेही आंदोलन होऊ नयेत म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, काहींनी फोंडा येथील बसस्थानकावर काळा झेंडा दाखवून शहांच्या गोव्यातील आगमनाचा निषेध करत निदर्शने केली. यामध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह इतरांचा समावेश होता.

  1. अमित पाटकर हे फर्मागुढीकडे जाताना जुने गोवे पोलिसांनी त्यांची खोर्ली येथे गाडी अडवली. त्यांच्यासोबत विरियातो फर्नांडिस, मोरेना रिबेलो, टोनी डायस व मिलाग्रि, फर्नांडिस यांना ताब्यात घेतले व सभा संपेपर्यंत स्थानकात बसवून ठेवले.

  2. महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा बिना नाईक, प्रदीप नाईक, श्रीनिवास खलप, नितीन चोपडेकर व इतरांना फर्मागुढीतून ताब्यात घेत दूर असलेल्या स्थानकात नेण्यात आले.

  3. काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर हे जुने गोवे येथील बहिणीच्या घरी गेले होते, तेथेच त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्यांच्या इमारतीच्या बाहेर पोलिस तैनात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Sales: गोव्यात दिवाळीदरम्यान 'रेकॉर्डब्रेक' वाहन खरेदी! GST कपातीमुळे ग्राहकांची पसंती; 11317 गाड्यांची नोंदणी

Horoscope: मोठा धमाका! अडकलेले पैसे मिळणार; आठवड्याची सुरुवात 'या' राशींना देणार भरभरून

Montha Cyclone: ‘मोंथा’बाबत मोठी अपडेट! 'गोव्यात' पाऊस थांबणार की नाही? वाचा माहिती..

Goa Vs Punjab: गोव्याचे पंजाबला दमदार प्रत्युत्तर! 92 धावांची अभेद्य सलामी; 'सुयश'चे अर्धशतक

Firing Case: नेमका ‘शूटर’ कोण समोर येणार? उगवे प्रकरणातील 'ते' पोलीस होते गोळीबार करणाऱ्या गटात; संशयितांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT