लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करण्यासाठी भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा आज गोव्यात दाखल झाले. अमित शहा दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक देखील उपस्थित होते.
त्यानंतर अमित शहा यांचा ताफा फार्मागुडीच्या दिशेने रवाना झाला. लोकसभा निवडणुकीसाठी फर्मागुढी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहीर सभेत अमित शहांकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
स्वयंपूर्ण गोवा सारखा उपक्रम राबवून सर्वसामान्यांचा विकास साधण्याची हिंमत केवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच दाखवली असे अमित शहा म्हाणाले. मात्र, या जाहिर सभेत त्यांनी म्हादई प्रश्नावर बोलणे टाळले.
यानंतर गृहमंत्री अमित शहांनी गोवा दौऱ्यात फोंड्यातील नागेशी मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उपस्थित होते. शहांना यावेळी प्रतिमा भेट देण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.