Goa Weather Updates : अनेक राज्यात उष्णतेचा कहर! गोव्यात असे असेल तापमान

गोव्यात आज काही प्रमाणात उष्णता असेल.
Weather Updates
Weather UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Weather Updates : दिल्लीसह भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची उष्णता जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत आज 17 एप्रिल रोजी देशाच्या राजधानीचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

IMD ने उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्टही जारी केला आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 दिवसांत राजस्थानच्या काही भागात तापमानात 1-2 अंश वाढ होण्याची शक्यता आहे.

गोव्यात आज काही प्रमाणात उष्णता असेल. आज दिवसभरात साधारण 32 अंश सेल्सिअस कमाल तापमान असेल तर 27 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल, असे सांगण्यात येत आहे. मागील 15 दिवसात गोव्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाने आपली हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पुन्हा उष्णता जाणवू लागली आहे.

Weather Updates
Amit Shah In Goa: 'फक्त दक्षिण गोवा जागेसाठी येथे आलोय,' फर्मागुडीतून शहांची प्रचार तोफ धडाडली

हवामान विभागाच्या मते, 18 एप्रिल रोजी नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे जोधपूर, बिकानेर, अजमेर विभाग, शेखावती, श्रीगंगानगर, हनुमानगढ, अलवर, भरतपूर जिल्हे आणि आसपासच्या भागात वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमधील काही जिल्ह्यांमध्येही पाऊस पडू शकतो. राज्यातील उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वरमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

तापमानात घट होऊ शकते

हवामान खात्यानुसार, 17-20 एप्रिल दरम्यान जम्मू-काश्मीरमधील उंच शिखरांवर हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे. विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पावसादरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गडगडाटी वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. 7-8 अंश सेल्सिअस तापमानात "अचानक" घसरण होऊ शकते.

उष्णतेची लाट कधी घोषित केली जाते?

जेव्हा कोणत्याही ठिकाणचे कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअस, किनारपट्टीच्या भागात किमान 37 डिग्री सेल्सिअस आणि डोंगराळ भागात किमान 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढते किंवा ते किमान 4.5 अंश सेल्सिअस होते तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com