Plantation in potholes Dainik Gomantak
गोवा

Zuarinagar: झुआरीनगरात अनोखं आंदोलन! महामार्गावरच्या खड्यांमध्ये केले वृक्षारोपण; गोवा काँग्रेसचा उपक्रम

Goa Congress Protest: झुआरी ते उपासनगर पर्यंत उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहे. या कामामुळे जुन्या रस्त्याची वाताहत झालेली असून तो रस्ता सुरळीत करण्याकडे कुणाचे लक्षच नाही.

Sameer Panditrao

वास्को: गोवा प्रदेश युवा काँग्रेसतर्फे जागतिक पर्यावरणदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. झुआरीनगरातील महामार्गावर पडलेल्या खड्यांमध्ये त्यांनी वृक्षारोपण केले आणि सरकारने या मार्गावरील वाहतुकीच्या धोक्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष महेश नडार, पीटर डिसोझा व इतर काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. झुआरी ते उपासनगर पर्यंत उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहे. या कामामुळे जुन्या रस्त्याची वाताहत झालेली असून तो रस्ता सुरळीत करण्याकडे कुणाचे लक्षच नाही.

त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होतात व लोकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे सरकारचे लक्ष या रस्त्याच्या स्थितीकडे वेधण्यासाठी रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण करण्यात आल्याचे महेश नडार व कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी महेश नडार यांनी राज्य सरकार, आमदार, पंचायत, प्रशासन व उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या एमव्हीआर कंपनीवर टीका केली. त्यांना लोकांच्या जीवाचे पडून गेलेले नसल्याचा आरोप त्यांनी केला व रस्ता सुरक्षित करण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Food Court: डिचोलीतील 'फूड कोर्ट' अंधारात; दीड महिन्यापासून वीज दिवे बंद; व्यावसायिकांचा उदरनिर्वाह धोक्यात

Seattle Center Shooting: अमेरिकेतील सिएटलमध्ये फूड फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; दोन ठार, पाच जण जखमी Watch Video

Salcete No Development Zone: सासष्टीतील 1.02 कोटी चौमी जमीन 'ना विकास क्षेत्र' करण्याचा प्रस्ताव! 5 गावांचा समावेश, ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविण्यात आल्या

Goa Development Projects: 'पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळेच गोव्याचा विकास!' सड्या येथे इस्पितळाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT