Zuarinagar Raid: कंपन्यांचे कर्मचारी असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांना कोट्यवधींचा गंडा; झुआरीनगरातील कॉल सेंटरचा पर्दाफाश

Zuarinagar Illegal Call Centre: झुआरीनगर येथील एका बंगल्यात बेकायदा सुरू असलेल्या कॉल सेंटरवर सायबर क्राईम कक्षाच्या पोलिस पथकाने काल रात्री छापा टाकून मुख्य सूत्रधार मयंक कौशिक याच्यासह २४ जणांना अटक करण्यात आली.
Zuarinagar Raid
Zuarinagar Call CentreDainik Gomantak
Published on
Updated on

Zuarinagar Illegal Call Centre Busted

पणजी: झुआरीनगर येथील एका बंगल्यात बेकायदा सुरू असलेल्या कॉल सेंटरवर सायबर क्राईम कक्षाच्या पोलिस पथकाने काल रात्री छापा टाकून मुख्य सूत्रधार मयंक कौशिक याच्यासह २४ जणांना अटक करण्यात आली. हे कॉल सेंटर चालवण्यासाठी वापरात असलेले २६ लॅपटॉप्स, २४ हेडफोन्स, ८ इंटरनेट रावटर्स व २६ मोबाईल जप्त करण्यात केले आहेत.

अमेझॉनसह इतर विविध कंपन्यांचे कर्मचारी असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांची माहिती घेऊन सुमारे १ कोटीची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. न्यायालयाने सर्व संशयितांना ३ दिवस पोलिस कोठडी दिली आहे.

झुआरीनगर येथील एका बंगल्यात बेकायदा सुरू असलेल्या कॉल सेंटरवर सायबर क्राईम कक्षाच्या पोलिस पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला व मुख्य सूत्रधार मयंक कौशिक याच्यासह २४ जणांना अटक केली. तसेच २६ लॅपटॉप्स, २४ हेडफोन्स, ८ इंटरनेट रावटर्स व २६ मोबाईल जप्त केले.

अमेझॉनसह इतर विविध कंपन्यांचे कर्मचारी असल्याचे भासवून या सेंटरमधून मदतीचे आमिष दखवत अमेरिकन नागरिकांची माहिती घेऊन सुमारे १ कोटीची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सर्व संशयितांना ३ दिवस पोलिस कोठडी न्यायालयाने दिली आहे.

पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले की, झुआरीनगर येथे बेकायदा कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. शहानिशा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मुख्य सूत्रधार मयंक कौशिक (३८) हा असून तो मूळचा दिल्लीतील आहे. या कॉल सेंटरसाठी बंगला भाडेपट्टीवर घेण्यात आला होता व गेल्या एक महिन्यापासून हे सेंटर सुरू होते. बंगल्याच्या मालकाने तेथे राहत असलेल्यांची माहिती जवळच्या पोलिस स्थानकावर दिली आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे.

२३ जण कर्मचारी

अटक करण्यात आलेले इतर २३ जण दिल्ली, मुंबई, हरियाना, उत्तर प्रदेश, अंदमान व निकोबार बेट, जम्मू काश्‍मीर, गुजरात व पंजाब अशा विविध राज्यांतील आहेत. या २३ जणांची मयंक याने कॉल सेंटरमध्ये कर्मचारी म्हणून नेमणूक केली होती. त्यांना दरमहा ३५ ते ४० हजार रुपये वेतन ठरवण्यात आले होते. मुख्य सूत्रधार मयंक कौशिक याने कॉल सेंटर गोव्यात सुरू करण्यासाठी ऑनलाइन जाहिरात दिली होती. त्यानुसार त्याने २४ जणांची नियुक्ती केल्यानंतर कॉल सेंटरमध्ये कामाची पूर्वकल्पना दिली होती. अमेरिकन नागरिकांशी कशा पद्धतीने संवाद साधायचा याचेही प्रशिक्षण दिले होते.

दिल्लीशी संबंध...

या कॉल सेंटरचे संबंध दिल्लीशी असल्याचे तपासात आढळले आहे. अमेरिकन नागरिकांची फसवणूक करून ट्रान्स्फर केलेली रक्कम दिल्लीत कोठे जमा केली जात होती याची माहिती मिळवण्यात येत आहे. मुख्य सूत्रधार मयंक कौशिक याचे दिल्लीतील रॅकेटशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे आंतरराज्य की आंतरराष्ट्रीय रॅकेटही असू शकते.

Zuarinagar Raid
Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

अमेरिकन नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक

या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेझॉनचे मुख्यालय, बँक कर्मचारी, पेपाल, आयओएस, झेल पे, ॲपेल पे, सरकारी एजन्सी तसेच कारवाई अधिकारी असल्याचे भासवून अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधत असायचे व त्यानंतर कर्ज मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या इतर समस्या सोडवण्यासाठी त्यांची माहिती घेत होते. या माहितीच्या आधारे नागरिकांच्या बँक खात्यावरील रक्कम ट्रान्स्फर करून ती मुख्य सूत्रधार इतर बँक खात्यावर जमा करत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com