Goa Congress  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : काँग्रेसमध्‍ये पैसेवाल्‍यांनाच महत्त्व! रॉयला फर्नांडिस

Goa Congress : जि. पं. निवडणुकीसाठीचा मुद्दा समितीसमोर आला नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress :

मडगाव, पक्षासाठी जे झटून काम करतात, अशा निष्‍ठावंत कार्यकर्त्यांना गोव्‍यातील काँग्रेस पक्षात फारशी किंमत मिळत नाही.

उलट जे पैसेवाले आहेत, त्‍यांनाच येथे डोक्‍यावर घेऊन नाचले जाते. गोव्‍यातील काँग्रेसचे निर्णय स्‍वत: काँग्रेसचे पदाधिकारी न घेता भलतेच कुणीतरी घेत असतात, असा घणाघाती आरोप काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन जि. पं. निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस प्रदेश समितीच्‍या माजी सचिव रॉयला फर्नांडिस यांनी केला.

गोमन्‍तक टी.व्‍ही. च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना त्‍यांनी हा आरोप केला. गोमन्‍तकचे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी त्‍यांची मुलाखत घेतली. गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या यू-ट्यूब, फेसबुक आणि इन्‍स्‍टाग्रामवर ही मुलाखत पाहण्यास उपलब्‍ध आहे. यावेळी त्या म्हणाल्या, आपण जरी काँग्रेस सोडली, तरी काँग्रेस अजूनही माझ्‍या हृदयात आहे. मात्र बाणावलीच्‍या जिल्‍हा पंचायत पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाशी युती करून बाणावलीच्‍या सर्वसामान्‍य काँग्रेस कार्यकर्त्यांवर जो अन्‍याय झाला, त्‍यांची प्रतिनिधी म्‍हणून मी या निवडणुकीत उभी आहे.

इंडिया आघाडी ही फक्‍त लोकसभा निवडणुकीसाठी होती, असे काँग्रेसचे पवन खेरा आणि आपचे अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे.

दिल्‍लीतील आगामी विधानसभा निवडणूक आप स्‍वतंत्ररित्‍या लढविणार आहे, असे असताना गोव्‍यातच हा आघाडीचा हनिमून २०२७ पर्यंत का चालू ठेवला आहे, असा सवाल फर्नांडिस यांनी केला. जिल्‍हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाणावलीत स्‍वत:चा उमेदवार उभा करावा, असा ठराव स्‍थानिक गटसमितीने घेतला होता. त्‍यांना विश्‍वासात न घेता ही युती का केली गेली? ही युती करताना प्रदेश समितीच्‍या समोरही हा विषय आणला गेला नाही.

यामुळे गोव्‍यातील काँग्रेसचे निर्णय सामूहिकरीत्या घेतले जात नाहीत, तर काही ठरावीक नेतेच परस्‍पर आपल्‍या पातळीवर हे निर्णय घेतात. अशाने गोव्‍यात काँग्रेस परत उभी राहण्याऐवजी ती आणखीन कमकुवत होणार, अशी भीती त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

आपने बाणावलीत निवडणुकीच्‍यावेळी प्रशंसनीय काम केल्‍याने त्‍यांना बक्षीस म्‍हणून जिल्‍हा पंचायतीची जागा सोडली जाते, असे वक्‍तव्‍य काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी केले होते.

यावर बोलताना फर्नांडिस म्‍हणाल्‍या, आम आदमी पक्षाने बनावटगिरी करून जिल्‍हा पंचायत निवडणूक जिंकली. काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांने (स्‍वत: फर्नांडिस यांनी) त्‍यांची ही बनावटगिरी न्‍यायालयीन लढा देऊन उघड्यावर आणली, असे असतानाही काँग्रेस बाणावलीची जागा बक्षीस म्‍हणून देत आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्‍या जखमेवर ते मीठ चोळण्‍यासारखे होणार नाही का?

नेत्यांचे कारस्थान!

गेल्या विधानसभा निवडणुकीतही बाणावलीत विचित्र प्रकार घडला होता. त्‍यावेळी पाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाणावलीच्‍या उमेदवारीवर दावा केला होता. मात्र त्‍या सर्वांना डावलून एका रात्रीत पक्षाबाहेरील उमेदवाराला काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली गेली. आम आदमी पक्षाच्‍या उमेदवाराला निवडून आणण्‍यासाठी काँग्रेसच्‍याच काही नेत्‍यांनी हे कारस्‍थान केले होते, हे नंतर उघड झाले, असा आरोपही फर्नांडिस यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT