Goa Todays Update: जीएसटी कौन्सिलच्या कायमस्वरुपी सदस्यपदावरुन मॉविन गुदिन्हो यांची उचलबांगडी

जीएसटी कौन्सिलच्या कायमस्वरुपी सदस्यपदावरुन मॉविन गुदिन्हो यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
Mavin Gudinho
Mavin Gudinho
Published on
Updated on

जीएसटी कौन्सिलच्या कायमस्वरुपी सदस्यपदावरुन मॉविन गुदिन्हो यांची उचलबांगडी

जीएसटी कौन्सिलच्या कायमस्वरुपी सदस्यपदावरुन मॉविन गुदिन्हो यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. गुदिन्हो यांच्या जागी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढे जीएसटी कौन्सिलच्या सर्व बैठकांना मुख्यमंत्री स्वत: हजर राहणार आहेत.

Mavin Gudinho
Mavin GudinhoDainik Gomantak

मडगावात कार जळून खाक

मडगाव येथे आगीत (GA06E9657) कार जळून खाक. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत मिळवले आगीवर नियंत्रण.

Car
CarDainik Gomantak

गृहमंत्रालयाकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना ‘सरकारी नोकरी’ योजनेअंतर्गत नियुक्ती पत्रे

गृहमंत्रालयाकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना ‘सरकारी नोकरी’ या योजनेअंतर्गत 20 जणांना नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. येत्या 6 महिन्यात उरलेल्या 40 जणांना नियुक्ती पत्र प्रदान करुण्यात येईल. आत्तापर्यंत 357 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.


Chief Minister Pramod Sawant
Chief Minister Pramod SawantDainik Gomantak

केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतली भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांची भेट!

यंदाच्या लोकसभा निवडणूकीत भाजप नेते श्रीपाद नाईक यांनी विक्रमी सहाव्यांदा बाजी मारली. मोदी सरकारमध्ये त्यांच्या रुपाने गोव्याला प्रतिनिधित्व मिळाले. मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आता श्रीपाद नाईक यांनी आज भारतरत्न आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Shripad Naik & LK Advani
Shripad Naik & LK AdvaniDainik Gomantak

रावणफोंड येथे कार आगीत खाक; जीवीतहानी टळली

रावणफोंड येथे आज सकाळी कारने अचानक पेट घेतला. आगीत कार पूर्णत: खाक झाली. गाडीतून धूर येत असल्‍याचे पाहून कार चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्‍याने सुदैवाने त्‍याला कोणतीही इजा झाली नाही. कारचे बोनेट उघडले असता इंजिनला आग लागल्याचे दिसून आले. त्यानंतर तात्काळ अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशामन दलाचे जवान तिथे पोहोचेपर्यंत कार पूर्णत: जळून खाक झाली होती.

Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

बार्देशमधील कॅन्का पर्रा येथील मिरॅक्युलस होली क्रॉस चर्चवर दिवसाढवळ्या दरोडा

बार्देश तालुक्यातील काणका पर्रा येथील मिरॅक्युलस होली क्रॉस चर्चवर दिवसाढवळ्या दरोडा पडला. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटीतून मोठी रोकड रक्कम चोरुन नेली, ज्यामध्ये तीन महिन्यांत जमा झालेल्या देणग्या होत्या. म्हापसा पोलीस सध्या घटनास्थळी पंचनामा करत आहेत.

जमीन हडप प्रकरण; मोरजीतील ग्रामस्थ पोहोचले एसआयटीत!

मोरजीमध्ये जमीन मालकांना अंधारात ठेवून 1 लाख 80 हजार 925 चौरस मीटर जमीन हडप करुन प्लॉटींग आणि बांधकाम सुरु केलेल्या GCA GHAI INFRA आणि M&S IRAP INFRA LLP या दोन कंपन्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोरजीतील ग्रामस्थांची लॅण्ड ग्रॅब एसआयटीकडे तसेच मुख्यमंत्र्यांनीही लक्ष्य घालण्याची मागणी केली.

काले येथील जंगलात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

काले, सावर्डे येथील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कुडचडे पोलिसांकडून अधिक तपास सुरु केला जात आहे.

Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

+92 नंबरवरील कॅालला बळी पडू नका; गोवा सायबर क्राइम सेलकडून ॲडव्हायझरी जारी

गोवा सायबर क्राइम सेलकडून सायबर अपहरण घोटाळ्याबाबत ॲडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. +92 पाकिस्तानी नंबरवरील कॅालला बळी पडू नका, असे ॲडव्हायझरीमध्ये सांगण्यात आले आहे. यासंदर्भात काही कॉल आला तर तात्काळ नागरिकांनी स्थानिक पोलीस किंवा सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार नोंदवावी. स्कॅमरचा नंबर ब्लॉक करण्यासाठी sancharsaathi.gov.in या वेबसाईटवर तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com