Goa Congress MLA Join Bjp Dainik Gomantak
गोवा

Goa Congress MLA Join Bjp: वर्ष उलटले तरी मंत्रिपद नाही; विकासही ठप्प

कार्यकर्तेही नाराज : काँग्रेसमधून आठ आमदारांच्या भाजप प्रवेशाची आज वर्षपूर्ती

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

Goa Congress MLA Join Bjp बरोब्बर एक वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला मोठे भगदाड पाडून काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये विलीन झाले हाेते. त्‍यावेळी यापैकी ज्‍येष्‍ठ आमदार दिगंबर कामत आणि आलेक्‍स सिक्‍वेरा यांना मंत्रिपदे मिळतील, अशी शक्‍यता व्‍यक्‍त केली जात होती.

सत्ताधारी झाल्‍याने कामे झटपट होतील, या अपेक्षेने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्‍येही उमेद संचारली होती. १४ सप्‍टेंबर रोजी या घटनेला वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, कुणालाही मंत्रिपदही मिळाले नाही आणि विकासकामे करण्‍यासाठी पक्ष बदलणाऱ्या या आमदारांच्‍या मतदारसंघांत विशेष विकासकामेही झालेली नाहीत.

सिक्‍वेरांचा फायदा काय? : क्लिओफात कुतिन्हो

जो मतदारसंघ कडवा भाजपविरोधी आहे, त्‍या नुवेचे आमदार आलेक्‍स सिक्‍वेरा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्‍याची हाराकिरी का केली आणि त्‍यांना त्‍याचा काय फायदा झाला, हेच कळत नाही.

मात्र, आश्‍वासन मिळाल्‍याशिवाय कुणी पक्ष बदलत नाहीत. सिक्‍वेरांना काय आश्‍वासन दिले होते आणि ते पाळले की नाही हे कळत नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्‍लेषक ॲड. क्‍लिओफात कुतिन्‍हो आल्‍मेदा यांनी व्‍यक्‍त केली.

मी भाजपमध्ये प्रवेश केल्‍यामुळे मडगाव मतदारसंघात विकासकामे वाढणार आहेत. येत्‍या काही महिन्‍यांत अनेक प्रकल्‍प सुरू होणार आहेत. या राजकीय निर्णयामुळे माझ्‍याबाबतीत कुठलाही विपरित परिणाम झालेला नाही. माझी सगळी कामे पूर्ण होत आहेत.

- दिगंबर कामत, आमदार, मडगाव.

भाजपमध्ये प्रवेश केल्‍याची मला खंत वाटत नाही. माझ्‍या मतदारसंघात विकासकामे मार्गी लावण्‍यासाठी मी ज्‍या ज्‍यावेळी मी मुख्‍यमंत्र्यांकडे विकासकामांविषयी शब्द टाकला, त्‍या त्‍यावेळी त्‍या शब्दाचा मान राखला गेला आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्याचे कारण नाही.

- आलेक्‍स सिक्‍वेरा, आमदार, नुवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT