पोर्तुगीजांनी सुमारे 1,000 मंदिरे केली उद्धवस्त, ती नव्याने उभी करणार; CM सावंत यांचा दिल्लीत पुन्हा उल्लेख

CM Pramod Sawant: पोर्तुगीजांच्या काळात मंदिरांचा झालेला विध्वंस याची माहिती गोळा करण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे.
Goa CM Pramod Sawant In Delhi
Goa CM Pramod Sawant In DelhiDainik Gomantak

Goa CM Pramod Sawant In Delhi: काँग्रेस सरकारच्या काळात गोव्यातील अनेक प्रकल्प बंद पडले, 2014 मध्ये भाजप सरकार आल्यानंतर सर्व प्रकल्प आणि पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. हा डबल इंजिन सरकारचा फायदा आहे.

पोर्तुगीजांच्या काळात मंदिरांचा झालेला विध्वंस याची माहिती गोळा करण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे. लवकरच समितीचा अहवाल येणार आहे.

सुमारे एक हजार मंदिरे या काळात उद्धवस्त करण्यात आली ती मंदिर नव्याने बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीत एका खासगी कार्यक्रमात दिली म्हणाले.

हवामान बदलामुळे आपण सर्वजण चिंतेत आहोत. अक्षय ऊर्जा सुरू करणारे गोवा हे पहिले राज्य आहे. लवकरच राज्य पूर्णपणे सौरऊर्जेवर आधारित असेल. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणारे गोवा हे पहिले राज्य आहे.

गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धा पाहण्यासाठी तुम्हा सर्वांना मी आत्ताच आमंत्रण देतो.

आयआयटीचा कायमस्वरूपी कॅम्पस असावा, यासाठी गोव्यात प्रयत्न सुरू आहेत, यासाठी आम्ही काम करत आहोत. लवकरच गोव्यात आयआयटी कॅम्पसही असेल. अशी ग्वाही सावंत यांनी दिली.

गोव्याला गोमंतक प्रदेश म्हणूनही ओळखले जात होते. येथे फक्त पोर्तुगीजांचाच इतिहास नाही. तर, त्याआधी कदंबकाळ छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेकांनी गोव्याची संस्कृती वाढवली, गोव्याचा इतिहास लिहिला, त्यांचाही उल्लेख फार महत्त्वाचा आहे.

समान नागरी संहितेचे पालन करणारे गोवा हे पहिले राज्य असल्याचे सांगत, येथे हिंदू, मुस्लिम आणि कॅथलिक एकत्र राहतात. असे सावंत म्हणाले.

2022 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात गोव्यातील सर्व प्रकल्प बंद पडले होते. गोव्यासारख्या छोट्या राज्यात यावर काहीतरी तोडगा काढणे आवश्यक होते.

2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर रस्ते बांधणीचे सर्व प्रकल्प सुरू झाले, सध्या जवळपास 90 टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत, उर्वरित प्रकल्पही काही दिवसांत पूर्ण होतील, असे सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com