Goa Congress Loksabha Candidate| Ramakant Khalap And capt. Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोव्यातील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अर्ज केव्हा दाखल करणार? तारीख आली समोर

Goa Congress:काँग्रेसने उशीरा उमेदवार जाहीर करुन देखील प्रचारात आघाडी घेतली असून, लवकरच उमेदवारी अर्ज देखील दाखल केले जाणार आहेत.

Pramod Yadav

Goa Congress

गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी पुढील महिन्यात सात तारखेला मतदान होणार आहे. राज्यातील भाजप, काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाच्या वतीने सध्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे.

काँग्रेसने उशीरा उमेदवार जाहीर करुन देखील प्रचारात आघाडी घेतली असून, लवकरच उमेदवारी अर्ज देखील दाखल केले जाणार आहेत.

काँग्रेसने उत्तर गोव्यातून रमाकांत खलप यांना तर दक्षिणेतून कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. पक्षाने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर उत्तरेत पत्रादेवी आणि दक्षिणेत लोहिया मैदानावरून प्रचाराचा शुभारंभ केला.

दरम्यान, दोन्ही उमेदवारांच्या उमेदवारी अर्जाबाबत महत्वाची माहिती समोर आली असून, सोमवारी (दि.१५ एप्रिल) खलप यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे. तर, मंगळवारी (दि.१६ एप्रिल) विरियातो फर्नांडिस यांना अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पक्ष नेत्यांच्या अध्यक्षतेखाली प्रचाराची दीक्षा ठरविण्यासाठी मांद्रे येथे महत्वाची बैठक पार पडली.

मांद्रे गावचे सुपूत्र रमाकांत खलप यांना काँग्रेसने उत्तरेतून उमेदवारी दिली आहे. मांद्रेवासिय खलप यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केला. यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित होते.

तसेच, इंडिया आघाडीचे घटक पक्ष गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाचे नेते देखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान, मांद्रेचे नागरिक मोठे मताधिक्य मला देतील असा, विश्वास रमाकांत खलप यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT