Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'केजरीवाल - ममतांचा पक्ष भाजपसाठी काम करतात, गोव्यात त्यांनी निवडणूक लढूच नये'; अंजली निंबाळकरांचा हल्लाबोल

Goa elections 2027: विधानसभेच्या निवडणुकीसाठी केवळ गोव्यात येऊन भाजपसाठी जे काम करतात, ते आम आदमी आणि तृणमूल काँग्रेस पक्षाने दाखवून दिले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: विधानसभेच्या निवडणुकीसाठी केवळ गोव्यात येऊन भाजपसाठी जे काम करतात, ते आम आदमी आणि तृणमूल काँग्रेस पक्षाने दाखवून दिले आहे. त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीत या पक्षांनी उतरूच नये, असा सल्ला महिला काँग्रेसच्या प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिला आहे.

महिला काँग्रेसच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षांनी काँग्रेसचे मोठे नुकसान केले. भाजपच्या ‘बी’ टीमसारखे दोन्ही पक्षाचे काम आहे.

हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत उतरून भाजपलाच एकप्रकारे मदत करणार आहेत. २०२२ च्या निवडणुकीनंतर टीएमसीवाल्यांनी कार्यालयास कुलूपही लावले होते.

आपचे आमदार निवडून आले आहेत, पण त्यांचे प्रदेशाध्यक्ष (अमित पालेकर यांचे नाव न घेता) दिल्लीच्या निवडणुकीनंतर काँग्रेसवर टीका करीत आहेत. तुम्ही तुमचे घर सांभाळावे, असा सल्ला त्यांनी दिला.

निंबाळकर म्हणाल्या की, दिल्लीला तुमची गत काय झाली आहे. तशीच गत तुम्हाला गोव्यातही करून घ्यावयाची आहे, तर आम्ही स्वागत करतो. आपबरोबर जनमत राहिले नाही. गोव्यात लोकांचा आशीर्वाद काँग्रेसबरोबर राहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

Indian Super League: चेन्नईयीनचा विजय एफसी गोव्याने हिरावला; फातोर्ड्यात सामना 1-1 गोलबरोबरीत

Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

Wisdom of the Fourth Tree: तीन झाडांचा अहंकार मोडला, चौथं झाड मात्र आनंदात जगलं; आयुष्याचा मोठा धडा शिकवणारी गोष्ट!

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

SCROLL FOR NEXT