Goa Congress Mega protest In Margao: मडगावात 2 ऑक्टोंबरपूर्वी काँग्रेस पक्षाचे स्वत:चे कार्यालय उभारण्यात येईल. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मडगावमध्ये आघाडी घेईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला.
गुरुवारी गोवा काँग्रेसतर्फे ‘काळा दिन’ पाळण्यात आला. तसेच आठ फुटीर आमदारांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले.
14 सप्टेंबर रोजी काँग्रेसपक्षातून आठ आमदार फुटून भाजपात गेले होते. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मडगावात काँग्रेसतर्फे जिल्हा कार्यालयाकडून एक विशेष फेरी काढण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी काळे कपडे परिधान केले होते.
यावेळी आठ आमदारांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले तसेच निदर्शने करण्यात आली. यावेळी पाटकर म्हणाले, मडगाव मतदारसंघात पुन्हा काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी उभारू. देवाची शपथ विसरून काँग्रेस पक्षातून फुटणाऱ्या आठ आमदारांनी देवाला आणि निवडून आणणाऱ्या मतदारांना फसविले आहे.
येत्या निवडणुकीत आठ फुटीर आमदारांना मतदार योग्य तो धडा शिकवतील. 2 ऑक्टोंबरपूर्वी पक्षाचे कार्यालय उभारण्यात येईल. गोव्याचे राजकारण स्वच्छ करण्यासाठी येत्या निवडणुकीत आठ फुटीर आमदारांना घरी पाठवण्याची गरज आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.