Goa Congress Delhi Meeting Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोवा काँग्रेसची राहुल गांधी, खर्गेंसोबत मीटिंग! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा

Goa Congress Delhi Meeting: ज्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा आहे, ते मतदारसंघ इतर पक्षांसाठी सोडले जाणार नाहीत, अशी भूमिका दिल्लीत मांडण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आघाडीसाठी दरवाजे खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा आहे, ते मतदारसंघ इतर पक्षांसाठी सोडले जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका दिल्लीत झालेल्या बैठकीत मांडण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश चोडणकर, राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनात्मक पातळीवर करावयाच्या तयारीवर चर्चा करण्‍यात आली. सध्या सुरू असलेल्या संघटनात्मक निवडणुकांबाबतही निर्णय घेण्यात आले. भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त झाले असले, तरी काँग्रेसचा प्रभाव असलेले मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत सोडू नयेत, यावर भर देण्यात आला.

निवडणुकीस अद्याप वेळ असला तरी ज्या मतदारसंघांमध्ये काँग्रेस मजबूत आहे, तेथे तातडीने संघटनात्मक बांधणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधीच्या निवडणुकांतील कामगिरी आणि पक्षाला सातत्याने मिळणाऱ्या सुमारे २५ टक्के मतांचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी विश्वासार्ह आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी सूचना करण्यात आली.

सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार

बैठकीत काँग्रेस नेतृत्वाने अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा सल्ला दिला. येत्या काळात सरकारविरोधी मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. युवक काँग्रेसच्या आंदोलनांच्या धर्तीवर अचानक आंदोलन करण्यावर भर देण्याचेही सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसची आंदोलने तीव्र होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

Goa News: सरकारी, सार्वजनिक भूखंडांवर राहणार आता कडक नजर! तालुकानिहाय पथके स्थापन; सुट्ट्यांच्या दिवशीही कडक देखरेख

Goa Theft: गोव्यात चोरट्यांचा धुमाकूळ! म्हापसा, पर्वरी, थिवी, कोलवाळ परिसरात 7 घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास

Goa Accident Death: अंजुणे धरणाजवळ भीषण अपघात! युवतीचा मृत्यू, 5 प्रवासी जखमी

Rashi Bhavishya: 'या' राशींनी आता थांबायचं नाय! नवीन संधी दरवाजा ठोठावणार; तयार रहा

SCROLL FOR NEXT