Congress  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: ‘मणिपूर’बाबत भाजप असंवेदनशील - चोडणकर

पक्षांतर केलेल्यांकडून निषेधाऐवजी सांत्वन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गोव्यातील भाजपचे व पक्षांतर केलेले आमदारांनी मणिपूरच्या लोकांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्याऐवजी सांत्वन केले आहे, त्यामुळे ते त्यांचे अश्रू पुसण्यास अपयशी ठरले आहेत.

हे भाजप सरकार असंवेदनशील असल्याची टीका गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

गोव्यात पक्षांतर केलेले हे आमदार धर्मनिरपेक्ष अल्पसंख्याक मतांवर विजयी झाले होते. परंतु भाजपच्या मुख्य इंजिनला मणिपूरमधील ख्रिश्चन समुदायाचे संरक्षण करायला सांगण्यास ते अयशस्वी ठरले.

जागतिक नेत्यांनी या घटनेचा निषेध केला, पण मणिपूरबाबत गोव्यातील भाजपचे आमदार गप्प राहिले, हे लज्जास्पद आहे. विरोधकांचा दबाव जाणवल्यानंतर, भाजप आमदारांनी मणिपूरच्या जनतेचे सांत्वन करण्यासाठी औपचारिकता केली, मात्र निषेध केला नाही. भाजप सरकारच्या असंवेदनशील दृष्टिकोनाचा निषेध करण्यात असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.

मणिपूरमधील हिंसाचारात 150 हून अधिक निष्पाप लोक मारले गेले आहेत आणि अनेक अल्पसंख्याक वस्त्या आणि चर्च नष्ट झाल्या आहेत. अनेक घटनांमुळे गोव्यातील लोक व्यथित झाले आहेत आणि त्यांनी मणिपूरच्या लोकांशी एकता व्यक्त केली आहे.

मात्र, मणिपूरमधील या घटनांबाबत आवाज उठवण्यात भाजपचे आमदार अपयशी ठरले आहेत. यावरून ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात केंद्र सरकारचे अपयश दिसून येते.

मणिपूरमधील भाजपचे एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आर वनरामछुनंगा यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आणि चर्च आणि इतर वस्त्यांचा नाश रोखण्यात सरकारचे अपयश स्वीकारून पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

भाजपला लोकसभेचे वेध

काँग्रेस पक्षाला मणिपूरमधील परिस्थितीबद्दल चिंता आहे आणि त्यांचे नेते शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र केंद्र सरकार व त्यांच्या राज्यातील सरकारांना आगामी लोकसभेचे वेध लागले आहेत.

त्यांना मणिपूरमध्ये घडत असलेल्या प्रकरणाकडे लक्ष देण्यात वेळ नाही. मणिपूर जळत असताना प्रधानमंत्र्यांनी अनेक देश आणि राज्यांचा दौरा केला. भारत सरकारने मणिपूरच्या लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी सोडून दिले आहे.

राज्यात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी केंद्र सरकारने प्रामाणिकपणे आणि सर्व आवश्यक पावले उचलली पाहिजेत, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Rapan Fishing: चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओढली रापण! होडी खेचून आणली किनाऱ्यावर; शाळेचा अभिनव उपक्रम

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

Goa: गोव्याच्या विद्यार्थिनीचा आवाज घुमला राजस्थानात! 'वनिष्ठा'चे युवा संसदेत प्रतिनिधित्व; दहशतवादावर मांडले परखड विचार

Ganesh Idol: स्वतः 'गणेशमूर्ती' तयार करण्याचा आनंद वेगळाच! शिल्पकलेची कार्यशाळा

SCROLL FOR NEXT