Shripad Naik : विर्नोडा जंक्शनवर भुयारी मार्ग व्हावा

पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक : केंद्रीय महामार्ग मंत्री गडकरींशी चर्चा
Shripad Naik
Shripad Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन पेडणे येथील विर्नोडा ज॔ंक्शन भुयारी मार्गा संदर्भात सविस्तर चर्चा केली.

चर्चेअंती गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभिय॔त्यांना या संबंधी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले.

पत्रादेवी ते खरासवाडा हा महामार्ग विर्नोडा जंक्शनमधून जातो. या जागी ‘भुयारी मार्ग’ची नितांत आवश्यकता आहे. तो न झाल्यास भूतवाडा, वाळपे आणि विर्नोडावासीयांना येणाऱ्या काळात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.

या विर्नोडावासीयांच्या चिंतेकडे लक्ष वेधणारे पत्र विर्नोडा ग्रामपंचायतीतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले होते. या संदर्भात पंचायतीतर्फे ठरावही मंजूर करण्यात आला होता.

केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी याबाबतीत हस्तक्षेप करून विर्नोडावासीयांच्या समस्येवर तोडगा काढावा यासाठी नाईक यांच्याबरोबर एक बैठकही घेण्यात आली.

Shripad Naik
Goa Assembly Monsoon Session 2023 : राज्यात स्वातंत्र्यसैनिकांची 270 मुले अद्याप सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत

या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व गोवा सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्याअभियंत्यांना आणि एमव्हीआरच्या अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.

या बैठकीत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्याला विद्यमान जंक्शनच्या जागी भुयारी मार्ग बांधण्यासाठी साईट प्लॅन तयार करण्याचे आदेश दिले. आर्थिक अडचण आल्यास खासदार निधीतून तरतुदीची तयारी नाईक यांनी या बैठकीत दर्शविली होती.

प्राधिकरणला कार्यवाहीच्या सूचना

या अनुषंगाने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विर्नोडा पंचायतीचे भुयारी मार्गाची मागणी करणारे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले.

गडकरी यांनी तातडीने यासंबंधी कार्यवाही करावी, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आभियंत्याला केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories


Suhana Naik Arrest news
Mapusa Police Arrest Murder Suspects
Subhash Naik Death Case
Damu Naik In Delhi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com