Mapusa News: अनियंत्रित विक्रेत्यांवर आळा घालण्यासहित 'या' मागण्यांचे नगराध्यक्षांना व्यापारी संघटनेकडून निवेदन

म्हापसा व्यापारी संघटना : पालिकेने बाजारपेठेत पायाभूत सुविधा पुरवाव्यात
Mapusa Market Issue
Mapusa Market IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Market Issue म्हापसा येथील पालिका मार्केटमध्ये सध्या अनियंत्रित विक्रेत्यांमुळे पादचारी किंवा आपत्कालीन सेवेच्या वाहनांना बाजारपेठेत जाण्यासाठी पुरेशी वाट नाही. त्यामुळे म्हापसा पालिकेने हा विषय गांभीर्याने घ्यावा.

विशेष म्हणजे, कराच्या स्वरूपात व्यापाऱ्यांकडून पालिका दुप्पट महसूल गोळा करते; परंतु त्या बदल्यात आम्हाला योग्य पायाभूत सुविधा देत नाही, अशी खंत म्हापसा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविली.

शुक्रवारी (ता.२८) म्हापसा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानुसार, येत्या सोमवारी (ता.३१) पालिका मुख्याधिकारी, व्यापारी संघटना तसेच मार्केट कमिटीसोबत येथील बाजारपेठेची संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेऊ आणि तोडगा काढू, असे आश्वासन नगराध्यक्षांनी या व्यापाऱ्यांना दिले.

Mapusa Market Issue
धक्कादायक! फातोर्ड्यात कुजलेल्या अवस्थेतील हात दिसला अन् नागरिकांची उडाली खळबळ; पोलीस घटनास्थळी दाखल

यावेळी म्हापसा पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, सचिव सिद्धेश राऊत, पालिका मार्केट समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर आदी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्दे...

  • मार्केटमधील बुहतांश अंतर्गत रस्त्यांची सध्या वाताहत झाली आहे. ते तातडीने दुरुस्त करावेत. याशिवाय काही गटरांवरील स्लॅब (झाकणे) असमान असल्याने अनेकदा वयस्कर मंडळी पाय अडखळून पडतात.

  • रात्री नऊनंतर मार्केटमध्ये काळोख पसरलेला दिसतो. कारण येथील पथदीप हे व्यवस्थितरीत्या पेटत नाहीत. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे चालत नाहीत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून चोरांसाठी ही नामी संधी बनू शकते.

  • मार्केटमध्ये पार्किंगची मोठी समस्या असून याकडे पालिकेने लक्ष द्यावे. काही विक्रेते हे रस्त्याच्या मधोमध बसतात, त्यामुळे अतिक्रमण केलेल्यांना हटवावे. तसेच पालिकेने करवाढही दुप्पट केली असून यावर फेरविचार करावा

Mapusa Market Issue
चिंताजनक ! शहरीकरणामुळे कॅन्सरच्या रुग्णांत मोठी वाढ!

रस्ता मोकळा करावा

सचिव सिद्धेश राऊत म्हणाले, बाजारपेठेतील विक्रेत्यांच्या अनियंत्रित संख्येमुळे भविष्यात एखादी आपत्ती ओढवल्यास इमर्जन्सी सेवेला मार्केटमध्ये प्रवेश करता येणार नाही.

याशिवाय काही विक्रेते प्रवेशद्वारावरच बस्तान मांडून व्यवसाय थाटतात. या विक्रेत्यांना तेथून हटवून रस्ता मोकळा करावा आणि रात्रीच्या वेळी विक्रेत्यांना येथे साहित्य मांडून ठेवण्यास परवानगी देऊ नये.

बाजारपेठेमधील काही शौचालये मागील आठ वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह बाजारात येणाऱ्यांची गैरसोय होते. वेळोवेळी याविषयी आम्ही आवाज उठविला; परंतु अद्याप यावर पालिकेस तोडगा काढता आलेला नाही. - श्रीपाद सावंत, अध्यक्ष, व्यापारी संघटना.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com