Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: करांमध्ये वाढ करून जनतेची लूट करण्यात भाजप व्यस्त- महिला काँग्रेस

महिला काँग्रेसची टीका- जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress केंद्रात भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या सरकारवर महागाईवरून ज्या टीका केल्या, त्याचे व्हिडिओ दाखवित प्रदेश महिला काँग्रेसने गुरुवारी भाजप सरकारवर जोरदार आसूड ओडले.

प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी भाजप सरकार कर वाढवून जनतेची लूट करीत असल्याची टीका केली. काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत नाईक यांच्यासमवेत शॅलेट मिरांडा, बेर्था कार्दोज, जरिना शेख आणि अनुराधा नाईक उपस्थित होत्या.

नाईक यांनी विविध वस्तू आणि इंधनावरील वाढीव कराची आकडेवारी मांडत भाजप सरकारला आरसा दाखविला. महागाईचा केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांवरच परिणाम होत नाही, तर त्याचा परिणाम सर्व जनतेवर होतोय, हे लक्षात घ्यायला हवे.

महागाईवर पंतप्रधान काहीही बोलत नाहीत, उलट करांमध्ये वाढ करून जनतेची लूट करण्यात ते व्यस्त आहेत. सध्या जीवनावश्‍यक वस्तुंच्या किंमती दुप्पट किंवा त्यापेक्षाही अधिक वाढल्या आहेत, हे सांगण्याची गरज नाही, असे त्या म्हणाल्या.

‘महागाईत गरिबांनी जगायचे कसे?’

भाजप सरकार घाऊक किंमत निर्देशांकात घट झाल्याची बढाई मारते, तेव्हा ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी जास्त किंमत का मोजावी लागते असा सवाल बीना नाईक यांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर उतरले आहेत, तरीही पेट्रोल व डिझेलचे दर कमी होत नाहीत. स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ झाली आहे, अशा स्थितीत गरिबांनी जगायचे कसे? केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण आणण्यात कमी पडले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT