Bench Order To Remove Encroaching Huts On Calangute Beach: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन खात्याच्या जागेत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या झोपड्या हटवण्याचा आदेश हल्लीच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिल्यानंतर पारंपरिक मच्छीमारी संघटनेमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
त्यांनी आमदार मायकल लोबो यांच्यासह आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यासंदर्भात पर्यटन व मच्छीमारमंत्र्यांनी संचालकांबरोबर बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यातील किनारपट्टीवर अतिक्रमण करून उभारलेल्या बेकायदा बांधकाम व व्यावसायिकांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. हल्लीच कळंगुट येथील सुमारे 240 झोपड्या उभ्या असल्याची माहिती जीसीझेडएमएने खंडपीठाला दिली होती.
ही सर्व अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी सरकारने त्यातील काही झोपड्या या पारंपरिक मच्छीमारांच्या पावसाळ्यात बोटी तसेच जाळी ठेवण्यासाठीच्या आहेत असे खंडपीठाला सांगण्यात आले होते.
मात्र, पर्यटन खात्याच्या जागेत ते अतिक्रमण असल्याने त्यावरही कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. पर्यटन खात्याने संंबंधित झोपड्यांच्या मालकांना नोटीस पाठवून त्या हटविण्याचे निर्देश दिले होते.
हे अतिक्रमण नव्हे- लोबो
या झोपड्या तात्पुरत्या असल्याने ते अतिक्रमण केले आहे असे म्हणता येणार नाही. ही पारंपरिक मच्छीमारांना त्यांच्या बोटी व जाळी ठेवण्यासाठी करण्यात आलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यामुळे सरकारने त्यांना यातून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे, असे लोबो यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.