Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: आरोग्य खात्याच्या हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्ट मध्ये 118 कोटी रुपयांचा घोटाळा- चोडणकरांचा घणाघात

Goa Congress: राणे यांनी कमिशनसाठी भाजप कार्यकर्त्याला डावलून इको क्लीन सिस्टीम अँड सोल्युशनला हा कंत्राट दिले - चोडणकर

Ganeshprasad Gogate

Goa Congress: आरोग्य सेवा संचालनालयाच्या हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्टच्या निविदेत भाजपच्या कार्यकर्त्याने भरलेल्या किंमतीपेक्षा दुप्पट बोली लावलेल्या आस्थापनाला कंत्राट देवून आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी 75 टक्के कमिशनसाठी 118 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरिश चोडणकर यांनी केला आहे.

भाजपने जे नेते काँग्रेसमधून आयात केले आहेत तेच आता या पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांना काम मिळण्यापासून वंचित ठेवत आहे हे या प्रकरणावरून सिद्ध झाल्याचे ते म्हणाले.

चोडणकर यांनी रविवारी काँग्रेस हावस मध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि भाजप सरकारचा पर्दाफाश केला.

त्यांच्या मते राणे यांनी कमिशनसाठी भाजप कार्यकर्त्याला डावलून इको क्लीन सिस्टीम अँड सोल्युशनला हा कंत्राट दिले आहे. यावेळी विरेंद्र शिरोडकर, फ्लोरियानो मिरांडा, अनवर सय्यद हे काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

‘‘इको क्लीन सिस्टीम अँड सोल्युशनने 104.8 कोटी रुपयांची निविदा सादर केली आहे, तर भाजपचे कार्यकर्ता प्रदीप शेट यांनी त्यांच्या महालसा सर्व्हिसेसच्या माध्यमातून केवळ 47.03 कोटी रुपयांची निविदा सादर केली आहे. मात्र शेट यांना डावलून ईको क्लीन या आस्थापनाला ही कंत्राट देण्यात आले आहे,’’असे चोडणकर म्हणाले.

तर पात्रता निकष सुद्धा इको क्लीन सिस्टीम अँड सोल्युशनने ठरवले होते, अधिकाऱ्यांनी नाही, असा आरोपही त्यांनी केला.

“सरकारने या सेवेच्या खर्चाचा अंदाज लावला नव्हता, ती बोली लावणाऱ्याद्वारे करावी लागली. यावरून हे स्पष्ट आहे की हे निविदा आरोग्यमंत्र्यांच्या जवळच्या कंपनीला देण्याचे निश्चित करण्यात आले होते,” असे ते म्हणाले.

“प्रदीप शेटची बोली 10 कोटींच्या कामाचा अनुभव नसल्याच्या शुल्लक कारणावरून जाणीवपूर्वक नाकारण्यात आली. त्याला निविदा प्रक्रियेपासून हेतुपुरस्सर दूर ठेवण्यासाठी त्याची आर्थिक बोलीही उघडण्यात आली नाही. कारण विश्वजित राणे यांना जिथून कमिशन मिळेल त्या आस्थापनेला कंत्राट द्यायचे होते,’’ असा घणाघात चोडणकर यांनी केला.

ते म्हणाले की, करार आणखी पाच वर्षांसाठी वाढविला जाणार असल्याने ही 118 कोटी रुपयांची लूट होईल. “पाच वर्षांपासून राणेंच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या या आस्थापनाने 104.8 कोटी रुपयांची बोली लावली होती.

तर शेट यांनी केवळ 47.03 कोटी रुपयांची बोली लावली होती. पाच वर्षांसाठी 57 कोटी रुपयांचा फरक आहे, पुढील पाच वर्षांसाठी 5 टक्क्यांनी वाढ केल्यावर ही आंकडेवारी 61 कोटी रुपयांची लूट होईल, म्हणजे 118 कोटी रुपयांचा घोटाळा,’ असे चोडणकर म्हणाले.

“भाजपच्या वाढीसाठी काम करणारे आणि श्रीपाद नाईक यांच्या बरोबर पंच म्हणून निवडून आलेले प्रदीप शेट यांनी मागील 25 वर्षे पक्षासाठी योगदान दिले आहे. मात्र न्याय मिळवण्यासाठी त्यांना न्यायालयात जावे लागले हे पाहून वाईट वाटते.

किमान प्रदीप शेट यांनी भाजपच्या आयात केलेल्या नेत्याने अवलंबलेल्या अशा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचे धैर्य दाखवले आणि उच्च न्यायालयाने त्यांच्या तांत्रिक बोलीवर पुनर्विचार करण्याचे आणि आर्थिक बोली उघडण्याचे निर्देश दिले हे उत्तम आहे,” असे चोडणकर म्हणाले.

“आम्ही फक्त ऐकले होते की एनजीओ, क्लव्ड आल्वारीस आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे इतर लोक न्यायालयात जातात. पण आता भाजपचे कार्यकर्तेही भ्रष्टाचाराला कंटाळले आहेत आणि त्याला आळा घालण्यासाठी कायदेशीर मदत घेण्यास सुरुवात केली आहे,” असे चोडणकर म्हणाले.

“मला मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे अध्यक्ष तानावडे यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे की ''जिथे राज्यांच्या तिजोरीची लूट केली जाते, ते रामराज्य’ आहे का?” असा प्रश्न चोडणकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT