पणजी: काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांना अर्ज देण्यास सुरुवात केल्यानंतर सहा दिवसांत सुमारे ४०० च्यावर अर्ज नेले गेले आहेत. येत्या ३० तारखेला अर्ज स्वीकारले जाणार असून त्यानंतरच कोणत्या मतदारसंघातून किती इच्छुकांनी इच्छा व्यक्त केली आहे, हे स्पष्ट होणार आहे.
पक्षाचे कार्याध्यक्ष एम. के. शेख यांनी ‘गोमन्तक''ला दिलेल्या माहितीनुसार सोमवार, ता. २३ पासून काँग्रेसने इच्छुकांना अर्ज देण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसापासून इच्छुकांनी अर्ज नेण्यास सुरुवात केली. गेल्या सहा दिवसांत ४०० च्यावर अर्ज नेले गेले आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांतून बहुसंख्येने अर्ज नेले आहेत.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जनमानसातील चेहरा असलेल्या कार्यकर्त्यालाही निवडणूक लढवता यावी, यासाठी पक्षाकडून अर्ज वितरण करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार सोमवारपासून अर्जांचे वितरण सुरू झाल्याने पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अर्ज नेले आहेत. तसेच हळदोणा, केपे आणि कुंकळ्ळी या मतदारसंघातूनही काही इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करीत अर्ज नेल्याची माहिती हाती आली आहे.
आघाडीला किती जागा?
काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक मतदारसंघांतील इच्छुक महिलांनी अर्ज नेले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष आघाडीतून वाट्याला येणाऱ्या जागांत किती महिलांना उमदेवारी देणार? याकडेही इतर पक्षांचेही लक्ष असणार आहे. महिलांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, या अपेक्षेने अर्ज नेले आहेत, ही निश्चित पक्षासाठी जमेची बाजू आहे. परंतु उमेदवारी देताना महिलांना डावलले जाणार नाही, याच उद्देशाने इच्छुकांनी अर्ज नेले आहेत, हाच प्राथमिक अंदाज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.