Goa Congress Press Conference Dainiak Gomantak
गोवा

मोदींच्या आवाहनावर काँग्रेसची टीका! ‘चहाचे राजकारण’ म्हणत पाटकरांचा टोला, आर्थिक धोरणावरही साधला निशाणा

Goa Congress Press Conference: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये भाषणातून सोने, पेट्रोल आणि परदेश दौऱ्यांवरील खर्च टाळण्याचे देशातील नागरिकांना आवाहन केले आहे, त्यावर प्रदेश काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये भाषणातून सोने, पेट्रोल आणि परदेश दौऱ्यांवरील खर्च टाळण्याचे देशातील नागरिकांना आवाहन केले आहे, त्यावर प्रदेश काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला ‘रस्त्यावरील चहाचे राजकारण’ असा उपरोधिक टोला हाणला आहे.

काँग्रेस भवनात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी दक्षिण गोवा खासदार विरियातो फर्नांडिस यांची उपस्थिती होती. पाटकर म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले म्हणून राज्यात भाजपचे नेतेही त्यांच्याच सुरात सूर मिसळत आहेत. भाजप नेत्यांच्या या वागण्यावर पाटकर यांनी टीका केली. भाजपचे मंत्री आणि आमदार रोडशोसाठी आसामला जात असताना नागरिकांना इंधन वाचवण्यास का सांगितले जात आहे, असा प्रश्न पाटकर यांनी उपस्थित केला.

केंद्राकडे आणि भाजपच्या नेत्यांकडे स्पष्ट आर्थिक धोरणाचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला आणि गोव्यातील ठप्प झालेल्या खाण क्षेत्रामुळेही रुपया कमकुवत झाला असल्याचे म्हटले. आज डॉलरची किंमत झपाट्याने वाढत आहे, यावरून देशाच्या आर्थिक स्थिती कोणत्या स्तरावर पोहोचली आहे, हे स्पष्ट दिसते. इंधन वाचवायचे झाल्यास भाजपच्या सर्व राज्यातील मंत्री, आमदार वाहनाने फिरतात, त्यांना वाहने चालवण्यास बंदी घालावी. देशाची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासाळलेली आहे.

ते पुढे म्हणाले, देश आर्थिक गर्तेत अडकला होता तेव्हा काँग्रेसकडे असणाऱ्या अर्थतज्ञांमुळे देशाची आर्थिक स्थिती डगमगली नाही, याची आठवण करून देत पाटकर म्हणाले, जर भारतासमोरील आर्थिक संकटावर काही सल्ले हवे असतील तर काँग्रेसकडील असलेल्या नेते ते देतील, असेही पक्षाकडे चांगले आर्थिक सल्लागार आहेत, त्यांचा त्यांनी सल्ला घ्यावा, असेही त्यांनी भाजप सरकारला सूचविले.

निव्वळ फसवणूक!

खासदार विरियातो म्हणाले, देशाचा कारभार भाजपचे दोनच नेते चालवीत आहेत. कोणतेही ध्येय न ठेवता कारभार करणारा देशाचा पंतप्रधान आहे. पाच राज्यांची निवडणूक आली, तेव्हा देशाची ५ लाख ट्रिलीनयवर अर्थव्यवस्था होणार असल्याचे सांगतात आणि निवडणूक होताच देशापुढे आर्थिक संकट आल्याचे जाहीर करतात, ही देशाची निव्वळ फसवणूक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: प्रवाशांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा! जनशताब्दीमध्ये सडलेली फळं विकणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्याला रंगेहाथ पकडलं; कोकण रेल्वेची कारवाई

Tripushkar Yog 2026: 16 जूनला महासंयोग! त्रिपुष्कर योग बदलणार 4 राशींचं नशीब; पैशांचा होणार पाऊस

Amthane Dam: आमठाणे जलाशयात मुबलक जलसाठा! साळ येथील शापोरा नदीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया अखेर बंद

Goa Tourists: गोव्यात पर्यटनाच्या नावाखाली चाललंय काय? रस्त्यांवर मृत्यूशी खेळणाऱ्या स्टंटबाजांचा धुमाकूळ; पोलिस, कायद्याचा धाक उरला नाही

Goa Traffic Congestion: धारगळची डोकेदुखी कधी थांबणार? 'दोन खांब' येथील वाहतूक कोंडीवर प्रशासन गप्प; दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT