Citizens of Shristhal Panchayat area giving information regarding all aspects of Forest Development Corporation at Shristhal. (Goa)
Citizens of Shristhal Panchayat area giving information regarding all aspects of Forest Development Corporation at Shristhal. (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: लाखो चौरस मीटर जमीन संगनमताने विकली

Sandeep Survekamble

काणकोणमधील वनविकास महामंडळाच्या (Cancone Forest Devlopment Corporation Land) ताब्यात असलेली ९ लाख चौरस मीटर जमिन कोमुनिदाद संस्थेच्या (Komunidade) पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून विकल्याचा (Sold) गंभीर आरोप स्थानिकांनी केला. काणकोणमधील श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील वनविकास महामंडळाच्या ताब्यात असलेली ९ लाख चौरस मीटर जमिन कोमुनिदाद संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून विकल्याचा स्थानिकांचा दावा आहे. या प्रकरणाला स्थानिकाबरोरच पवन शांता तुबकी यांनी वाचा फोडल्यानंतर प्रशासन (Administration) खडबडून जागे झाले आहे. काणकोणचे मामलेदार विमोद दलाल यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी (Matter inquiry) करून अहवाल सरकारला (Government) पाठविला असल्याचे सांगितले.

मूळ कोमुनिदाद मालकीची असलेली १४ लाख चौरस मीटर जमिन वनविकास महमंडळाने १९७४ मध्ये ताब्यात घेऊन त्या जमिनीवर काजूची लागवड केली दरवर्षी या काजू प्लॉटमधून महामंडळाच्या तिजोरीत २५ लाख रुपयांच्या महसुलाची भर पडते. या जमिनीचा सर्व्हे क्रमांक १८५ असून, धनगरवाडा, आवळेमळ येथील ही जमीन आहे. या वनखात्याच्या एकूण जमिनीपैकी ९ लाख जमिनीवर येथील एका रहिवासीयाने दावा सांगून न्यायालयात धाव घेतली; मात्र जमीन वनविकास महामंडळाच्या ताब्यात असली तरी जमिनीच्या १/१४ च्या उताऱ्यावर कोमुनिदाद संस्थेचे नाव होते. खटला सुरू असताना कोमुनिदाद संस्थेच्या पदाधिकारी न्यायालयात हजर राहिले नसल्याने निर्णय दावा सांगणाऱ्याच्या बाजूने लागला. या जमिनीचे भूखंड पाडून जमीन विकण्याचा सपाटा सुरू झाला. काही भूखंडावर दगडी कुंपण घालण्यात आले आहे, तर काही भूखंडावर चिरे, रेती असे बांधकाम साहित्य आणून टाकण्यात आले असल्याचे पवन तुबकी व ग्रामस्थांनी सांगितले.

२०११ मध्ये दावेदाराने न्यायालयात दावा सादर केला; मात्र वनविकास महामंडळाने २०१३ मध्ये जमिनीच्या १/१४ उताऱ्यावर नाव दाखल केले. या जमिनीवर लोलये येथे भगवती पठारावर प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर कोमुनिदाद संस्थेने जमिन आयआयटी प्रकल्पाला देण्याची तयारी केली होती, पण ही जागा गुरे चरण्याची पारंपारिक जागा असल्याचे कारण पुढे करून प्रकल्प येथे स्थापन करण्यास विरोध झाला होता, असे माजी सरपंच देवेंद्र नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT