गोवा ट्रिपला जाताय? 'या Goan Food' चा आनंद नक्की घ्या
गोवा सरकारने बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना नियमांचे बंधन घालून एंट्री दिली आहे. जर तुम्ही आता किंवा कधीतरी गोवा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर, तिथल्या फेमस पदार्थाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. असे काही पारंपारिक पदार्थ आहेत ज्याची चव तुम्ही गोव्याला (Goan Food) गेल्यावर नक्कीच घेतली पाहिजे. भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या राज्यांमध्ये विविध प्रकारची खाद्यसंस्कृती आहे.
1) Bimbli pickles
जर तुम्हाला लोणचं आवडत असेल आणि लोणच्याच्या विविध प्रकारांच्या शोधात आपण असाल तर, गोवा बिंबली हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असु शकतो. ह्या लोणच्याची चव गोड, कुरकुरीत, आंबट आणि मसालेदार आहे आणि करीसोबत उत्तम चवदार लोणच्याची जोड म्हणून गोवन बिंबली Goan Bimbli लोणच चविनं खाल्ल जातं.
2) Authentic Goan Homemade Thali
आपल्याकडे गोव्यातील फिश झकुटी, पोर्क विंदालू आणि इतर लोकप्रिय पदार्थ माहीती आहेत. यावेळी मात्र आपण थोडे गोव्याच्या खोल खाद्य संस्कृतीकडे वळणार आहोत. घरगुती आणि रूचकर जेवणाचा आनंद घेणार आहोत. आणि गोव्याच्या अस्सल गोवा घरगुती थाळी च्या वैशिष्टांबद्दल माहिती करून घेणार आहोत. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही गोव्याला जाल तेव्हा तुम्हाला या भोजनाचा आनंद घेता येणार.
3) Ghontan Sasav
पिकलेल्या आंब्याची करी गोड, मसालेदार आणि तिखट चविची असते. ही एक स्वादिष्ट शाकाहारी गोवन डिश आहे. किसलेले नारळ आणि मसाल्यांनी बनवलेल्या करी सोबत वाफवलेल्या भात खायला देतात. जो गरम गरम असल्याने खुप स्वादिष्ट लागतो. ज्याला गोवन भाषेत घोटन सासव म्हणतात. गोव्यात, GSB समुदायाचे म्हणजेच गौड सारस्वत ब्राह्मणांचे हे मांसाहारी आणि शाकाहारी जेवण आहे. ही एक जुनी डिश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.