Mopa Airport Project Dainik Gomantak
गोवा

Goa: मोपा विमानतळ प्रकल्पात कंपनीचा हालगर्जीपणा

मोपा विमानतळ प्रकल्पाला (Mopa Airport Project) योग्य नियोजन नसल्याने त्याचं पाणी आणि दगड मोठ्या प्रमाणात येथील शेतात तसेच तुळसकर वाडी (Tulaskar Wadi) येथील शेतात घेऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

दैनिक गोमन्तक

मोपा विमानतळ प्रकल्पामध्ये (Mopa Airport Project) बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विमानतळ परिसरातील उगवे पंचायत (Ugve Panchayat) क्षेत्रातील तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाच्या (Cyclone) दरम्यान पावसाचे पाणी साठवून मोपा विमानतळ प्रकल्पाला योग्य नियोजन नसल्याने त्याचं पाणी आणि दगड मोठ्या प्रमाणात येथील शेतात तसेच तुळसकर वाडी (Tulaskar Wadi) येथील शेतात घेऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या भागाची पाहणी करण्यासाठी खास मोपा विमानतळ प्रकल्पावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांच्याबरोबर गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar), मोपा विमानतळ बांधकाम कंपनीचे सी.ई.ओ. आर.वि.शेषन, मोपा विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी श्री. शानबाग उपस्थित होते.

शुक्रवारी मोपा पठारावर ज्या ठिकाणी उगवे परिसरात पाणी वाहून शेतीची नासाडी झाली. त्या भागाची पाहणी केली तसेच मोपा विमानतळ पठाराच्या आणि बांधकामाची कामाची पाहणी मुख्यमंत्री यांनी करत मोपा विमानतळ बांधकामाचा कामाचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, वारखंड नागझर पंचायतीचे सरपंच संजय तुळसकर, पंच मंदार परब, पंच प्रदीप कांबळी तसेच अधिकारी व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे नुकसान झालेल्या भागाची आणि पठारावरून येणाऱ्या पाण्यासंबंधीची माहिती दिली.

यावेळी माजी सरपंच शशिकांत महाले यांनी सांगितले की,आमचा मोपा विमानतळ प्रकल्पाला विरोध नाही मात्र कंपनीचे अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्याने या हलगर्जीपणामुळेच संपूर्ण पठार मोठ्या प्रमाणात व्यापलेला आहे,त्याचे पाणी आणि दगड शेती बागायती तसेच परिसरात येऊन गावातील पिढीजात शेतीची नासाडी झाली. याबद्दल शेतकऱ्यांची नुकसानभरपाई द्यावी त्याचबरोबर ती माती आणि दगड या कंपनीचे अधिकाऱ्यांनी तातडीने काढून आमची जमीन सुरक्षित ठेवावी,अशी मागणी महाले यांनी केली.

यावेळी तुळशीदास गावस यांनी मोपा विमानतळ पठारावर जे काम सुरू आहे त्या कामाबाबत कंपनीच्या अधिकारी आणि कामगार वर्गाकडून हलगर्जीपणा झाल्यानेच याप्रसंगी उद्भवल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून नागरिकांची समस्या सोडविण्याकडे प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. यावेळी मोपा पठारावर कामाची पाहणी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी करत या कामाबद्दल समाधान व्यक्त करत विविध सूचना कंपनीच्या अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT