Goa Bridge | Colvale Dainik Gomantak
गोवा

Goa Bridge: कोलवाळ येथील महामार्गावरील पुलाचे काम 'पूर्ण'

Goa Bridge: महाखाजन बाजूचा एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला झाल्यावर हा पूल खुला करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Bridge: चारपदरी महामार्गासाठी कोलवाळ येथील शापोरा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून त्यावर हॉटमिक्स डांबरीकरणही करण्यात आले आहे. महाखाजन बाजूचा एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला झाल्यावर हा पूल खुला करण्यात येणार आहे.

सध्या असलेल्या कोलवाळ पुलाजवळ या नवीन समांतर पुलाचे काम गेले दीड वर्ष सुरू होते. राष्ट्रीय महामार्गाचे चारपदरी मार्गात रूपांतर करण्याचे काम सुरू झाल्यानंतर कोलवाळ पुलाच्या दुसऱ्या बाजूने समांतर पुलाची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यानुसार दीड वर्षांपासून सुरवात झाली होती.

तसेच, या पुलाच्या बांधकामासाठी नदीत जवळच्या पुलाप्रमाणेच दोन खांब आहेत, तर दोन खांब जमिनीवर आहेत. पुलाची लांबी 252 मीटर, रुंदी 12.5 मीटर आहे. पुलाचे खांब हे कॉंक्रीटचे असून त्यावर लोखंडी तुळ्यांचा वापर केला आहे.

एक महिना आधीच पूल तयार

महाखाजन - धारगळ येथे महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर कोलवाळ नदीवरील एक पूल वाहनांना जाण्यासाठी व एक पूल येण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या पुलाचे बांधकाम नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. त्यापूर्वी एक महिना अगोदरच या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT