Colva Sewage Treatment Plant Dainik Gomantak
गोवा

Colva Sewage Treatment Plant: कोलव्यातील 6 कोटींच्या प्रकल्पाला स्थानिकांचा अल्प प्रतिसाद; सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर

Goa Wastewater Management: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 7.5 एमएलडीचा कोलव्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु करुन एक महिना उलटला आहे. 6 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

Manish Jadhav

Colva Sewage Treatment Plant Sees Low Response from Residents

मडगाव: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 7.5 एमएलडीचा कोलव्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु करुन एक महिना उलटला आहे. 6 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. नाल्यांमध्ये आणि कोलवा खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट या प्रकल्पाच्या माध्यमातून लावून ज्वलंत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन या प्रकल्पाच्या उद्‍घाटनावेळी दिले गेले होते. मात्र, व्यावसायिक आस्थापने आणि घरे यांच्याकडून भूगटार जोडण्यांसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या आणि जोडण्यांसाठी अधिकारिणींनी जारी केलेल्या एनओसीची स्थिती पाहता आतापर्यंत खूप कमी प्रतिसाद मिळाला आहे.

अधिकृत सूत्रांच्या मते, हॉटेल, रेस्टाॅरंट (Restaurant) आणि छोट्या आस्थापनांसह फारच कमी व्यावसायिक आस्थापनांनी आतापर्यंत सांडपाणी जोडण्यांसाठी साबांखाकडे संपर्क साधला आहे. आलेल्या 32 अर्जापैकी 15 व्यावसायिक आस्थापनांना जोडण्या देण्याचे काम सध्या सुरू आहे किंवा पूर्ण झाले आहे, तर आणखी पाच आस्थापनांविषयी विचार सुरू आहे. आतापर्यंत फारच कमी घरांनी जोडण्यांसाठी अर्ज केला आहे. एकंदरित जोडण्यांसाठी प्रतिसाद खराब आहे.

कोलवा (Colva) गावात केवळ 32 व्यावसायिक आस्थापने कार्यरत आहेत. या गावाला सांडपाण्याचा प्रश्न भेडसावत असताना अन्य आस्थापने जोडण्यांसाठी का पुढे येत नाहीत, असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

साबांखाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही घरांकडून कमी प्रतिसाद समजू शकतो. मात्र, व्यावसायिक आस्थापनांनी जोडण्यांसाठी पुढे येणे गरजेचे आहे; कारण गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने अलीकडेच सांडपाणी विल्हेवाटीची सुविधा नसलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. अमलात असलेल्या नियमांनुसार, व्यावसायिक आस्थापनांनी स्वखर्चाने भूगटार वाहिनीची जोडणी घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT