Waste Treatment Plant : विद्यार्थ्यांनी केला कचरामुक्तीचा संकल्प; लाखेरेतील प्रकल्पाची पाहणी

Resolution of waste disposal बायो-गॅस निर्मितीचीही घेतली माहिती
Garbage Project
Garbage Project Dainik Gomantak

डिचोली, पाळी येथील नवदुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (ता.२९) डिचोली पालिकेच्या लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली.

विद्यार्थ्यांनी कचऱ्यावरील प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर कचरामुक्तीचा संकल्प केला.

अभ्यासाचाच एक भाग म्हणून शिक्षक राया पावणे आणि प्रयोगशाळा साहाय्यक उन्नती परब गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रकल्पात आत जाऊन प्लास्टिकसह अन्य कचऱ्यावर प्रक्रिया कशी करतात, त्याची बारकाईने पाहणी करून माहिती जाणून घेतली.

Garbage Project
Goa G-TECH Expo: पणजीत सर्वात मोठ्या दोन दिवसीय तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, नोंदणी सुरु

कचरा प्रकल्पस्थळी उभारण्यात आलेल्या बायो-मिथानेशन प्रकल्पाचीही विद्यार्थ्यांनी पाहणी केली. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर या प्रकल्पात बायो-गॅस कसा तयार होतो. बायो-गॅसवरू वीजनिर्मिती कशी होते. त्याविषयी माहितीही विद्यार्थ्यांनी मिळवली.

दिवसेंदिवस लहानसहान चुकांमुळे ही समस्या उद्भवत असते, असे विजयकुमार नाटेकर यांनी सांगून प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळावा. आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले. शिक्षिक राया पावणे आणि प्रयोगशाळा साहायक उन्नती परब गावकर यांनी कचऱ्याची समस्या निर्माण कशी होते आणि ती कशी टाळता येते, त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, या हेतूने कचरा प्रकल्पाला भेट देण्यात आल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com