Colva Lift Accident Death Dainik Gomantak
गोवा

Elevator Accident: क्षणभराची गफलत अन् घात झाला! लिफ्ट खाली येण्यापूर्वीच गेट उघडून आत शिरली, 70 वर्षीय महिलेचा 'लिफ्ट'खाली अडकून मृत्यू

Colva Lift Accident Death: लिफ्ट खाली येण्यापूर्वीच गेट उघडून आत शिरल्याने ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोलवा येथे घडली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: लिफ्ट खाली येण्यापूर्वीच गेट उघडून आत शिरल्याने ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोलवा येथे घडली. मार्सिया रोसा पाशेको असे मृत महिलेचे नाव असून, त्या सेवानिवृत्त डॉक्टर असल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कोलवा येथील ‘रिलायन्स पार्क’ या इमारतीत ही दुर्घटना घडली. मार्सिया या फातोर्डा येथील चंद्रवाडा येथील असून,त्या मित्राला भेटण्यासाठी कोलवा येथे गेल्या होत्या.

पहिल्या मजल्यावर तो मित्र राहात असल्याने वर जाण्यासाठी त्यांनी लिफ्टचे बटन दाबले, दार उघडले आणि आत पाऊल टाकले. मात्र, त्यावेळी लिफ्ट वरच्या मजल्यावर होती. मार्सिया काही कळण्याच्या अगोदरच खाली पडल्या. त्याचवेळी लिफ्ट खाली येत होती. ते पाहून त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर इमारतीत राहणारे धावून आले आणि त्यांनी लिफ्ट बंद केली.

नंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून त्यांना बाहेर काढण्यात आले. लिफ्टची धडक बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाला. शवचिकित्सेनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोलवा पोलिसांनी ही घटना नोंदविली आहे. पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल कृष्णा पुढील तपास करीत आहेत.

स्वत:च्या इमारतीतच अंत

कोलवा येथे ज्या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली, ती एकमजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत मृत महिला मार्सिया यांच्याच मालकीची आहे. लिफ्टही जुनी असून, तिची देखभाल-दुरुस्ती केली जात नव्हती. त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली. यात कुठलाही घातपात नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT