College Uniform  Dainik Gomantak
गोवा

College Uniform : कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आता गणवेश सक्तीचा

College Uniform : उच्च शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक जारी

गोमन्तक डिजिटल टीम

College Uniform :

पणजी, राज्यातील सरकारी व अनुदानित महाविद्यालयांमधील विद्यार्थी आता गणवेशात दिसू लागतील. या विद्यार्थ्यांना गणवेश लागू करण्याचा निर्णय उच्च शिक्षण संचालनालयाने घेतला असून तसा आदेश संस्थाचालकांना जारी केला आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच २०२४-२५ मध्येच त्याची अंमलबजावणी करावी, असे परिपत्रक आज उच्च शिक्षण संचालनालयाने जारी केले आहे.

या परिपत्रकात उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी म्हटले आहे की, महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरणावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल आणि कपड्यांच्या निवडीशी संबंधित विचलितता कमी होईल.

गणवेश कोणता असावा, याचा निर्णय महाविद्यालय पातळीवर घेतला जावा, असेही या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. सर्व प्राचार्यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी गणवेश परिधान करूनच नव्या शैक्षणिक वर्षात पाऊल ठेवतील याची दक्षता घ्यावी, असेही परिपत्रकाच्या माध्यमातून बजावले आहे.

...पण अनुदान नाही!

गणवेशाचा खर्च विद्यार्थ्यांनाच करावा लागणार आहे. यासाठी कोणत्याही अनुदानाची तरतूद नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. गोवा मुक्तीनंतर प्रथमच महाविद्यालयीन पातळीवर गणवेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही खासगी व सरकारी महाविद्यालयांनी हे परिपत्रक काढण्याआधीही विद्यार्थ्यांसाठी गणवेश सक्ती लागू केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT