Goa Coconut Dainik Gomantak
गोवा

Goa Coconut Price: गोवेकरांवर 'नारळ' का रुसलाय? बाजारात तुटवडा कायम; दर अजून भडकलेलेच

Goa Coconut Rates: अळूमाडी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागली असून १५० रुपये प्रतिअळूमाडी दराने विकली जात आहे. इतर भाज्यांना चांगली मागणी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात श्रावणापासून नारळाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे दर मोठ्या प्रमाणात भडकले असून आताही पणजी बाजारात लहान नारळ ३५ ते ४० रुपये आणि मध्यम आकाराचा नारळ ५० रुपये दराने विकले जात आहेत.

काही मोजक्याच विक्रेत्यांकडे नारळ उपलब्ध आहेत. बाजारात इतर भाज्यांचे समाधानकारक असून मागील महिनाभरापासून ते स्थिर आहेत. बेळगावहून येणाऱ्या भाजीसोबतच स्थानिक भाज्या, काटेकणगी व इतर भाज्यांना चांगली मागणी आहे. आता अळूमाडी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागली असून १५० रुपये प्रतिअळूमाडी दराने विकली जात आहे.

पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. टॉमेटो, कांदे, बटाटे प्रतिकिलो ४० रुपये दराने विकले जात आहेत. चिटकी ८५, गाजर ७५, कारली ८०, काकडी ५०, भेंडी ७० रुपये किलो आहे. सोबतच मक्याची कणसे, भुईमुगाच्या शेंगा, रताळी यांना देखील चांगली मागणी आहे.

मक्याची कणसे शंभर रुपयांना पाच, रताळी ६० रुपये किलो तर शेंगा १०० रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जात आहेत. दरम्‍यान, राज्यातसह कोकणपट्ट्यात आणि बेळगाव भागातही मान्सूनोत्तर पाऊस मोठ्या प्रमाणात पडला असून यामुळे काही पिकांना फटका बसला आहे. येत्या आठवड्यात भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT