Souza Lobo Restaurant Dainik Gomantak
गोवा

'Souza Lobo' पाडण्‍यासाठी गेले, अन् जीसीझेडएमए पथकाची नाचक्की

आवश्‍‍यक कागदपत्रे न घेताच गेलेल्‍या हात हलवत माघारी परतले.

दैनिक गोमन्तक

हणजूण येथील वादग्रस्‍त ‘कर्लिस’ बार ॲण्‍ड रेस्टॉरंटवर हातोडा फिरविल्यानंतर गोवा किनारी व्‍यवस्‍थापन प्राधिकरण जीसीझेडएमए (Goa Coastal Zone Management Authority) विभागाच्या पथकाने काल मंगळवारी सकाळीच कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील प्रसिद्ध ‘सौझा लोबो’ Souza Lobo रेस्टॉरंटकडे आपला मोर्चा वळविला. परंतु हे बांधकाम पाडण्‍यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने या पथकाला हात हलवत माघारी फिरावे लागले. त्‍यामुळे या पथकाची नाचक्की झाली.

कळंगुट येथील ‘सौझा लोबो’ या रेस्‍टॉरंटवर कारवाई करण्‍याच्‍या उद्देशाने जीसीझेडएमएचे पथक गेले असता मालक ज्युड लोबो यांनी आपल्याकडील कागदपत्रे त्यांना सादर करून आपली बाजू समर्थपणे मांडली. परिणामी पूर्ण तयारी आणि आवश्‍‍यक कागदपत्रे न घेताच गेलेल्‍या या पथकावर हात हलवत माघारी परतण्‍याची नामुष्‍की ओढवली.

सरकारकडून स्‍थानिकांवर अन्‍याय: गोवा मुक्तीच्या आधीपासून कळंगुट येथे कार्यरत असलेल्या ‘सौझा लोबो’ या रेस्टॉरंटवर कारवाई करण्यासाठी सरकारने जी चपळाई दाखविली, तीच चपळाई शेजारच्या अरोरा नामक परप्रांतीय व्यावसायिकाने केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्‍यासाठी दाखवावी.

ज्युड लोबो, ‘सौझा लोबो’चे मालक-

या बांधकामाविरोधात आपण केलेली तक्रार कचरापेटीत टाकण्‍यात आली. उलट अरोरा याने आपल्‍याविरोधात केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्‍यात आली. यावरून सरकार पैशासाठी स्थानिकांवर अन्याय करीत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT