Ramakant Khalap Dainik Gomantak
गोवा

Goa Coastal Area: '..तर सुंदर गोवा संकल्पना धुळीस मिळेल'! किनारपट्टी भागासाठी खलपांनी केली ‘रोड मॅप’ची मागणी

Ramakant Khalap: सरकारने किनारपट्टी भागाचा ‘रोड मॅप’ जाहीर करणे गरजेचे असल्याचे मत माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी मांद्रे काँग्रेस गट समितीच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Sameer Panditrao

Ramakant Khalap About Coastal Land Security

हरमल: गोव्यातील किनारपट्टी व लोकवस्तीत जमिनी व डोंगर रूपांतरीत होत आहेत. डोंगर पोखरले जात आहेत, पाण्याची पातळी दूषित व टंचाई स्थिती तसेच अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात होत असल्याने सरकारने किनारपट्टी भागाचा ‘रोड मॅप’ जाहीर करणे गरजेचे असल्याचे मत माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी मांद्रे काँग्रेस गट समितीच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

मांद्रे येथील मांद्रे कॉलेजच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बाबी बागकर, नारायण रेडकर, मिंगेल फर्नांडिस, प्रदीप सावंत, गंगाराम मांद्रेकर आदी उपस्थित होते.

पंचायत सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, खासदार व जनतेस विश्वासात घेऊन आराखडा झाला पाहिजे. या भागात वास्तव्यास असलेल्या जनतेचे आगामी ५० वर्षात भवितव्य काय याचा विचार केला पाहिजे. जमीन रूपांतरण तातडीने रोखले नसल्यास, सुंदर गोवा संकल्पना धुळीस मिळेल, असेही ते पुढे म्हणाले.

‘कमाल जमीन धारणा कायदा लागू करावा’

सरकारने कमाल जमीन धारणा कायदा लागू केला पाहिजे. त्याअंतर्गत एकच व्यक्तीकडे जास्तीत जास्त किती जमीन असावी याचा देशभरात कायदा आहे, त्यानुसार नियोजन असावे. पेडण्यात कागदोपत्री १२ कोमुनिदाद संस्था असून त्यांच्या जमिनी गेल्या कुठे हा प्रश्न आहे. केरी तेरेखोल पुल अर्धवट स्थितीत आहे त्याविषयी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी खलप यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT