Goa Tourism: ..अधिकारी 'पॅराग्लायडिंग' पाहत होते मात्र कारवाई झाली नाही, बेकायदेशीर व्यवसायांवरून स्थानिकांचा आरोप

Paragliding services Goa: गेल्या कित्येक वर्षांपासून केरी-हरमल पठारावरून हरमल आणि केरी या दोन्ही समुद्र किनाऱ्यांवर बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंग सुरू आहे.
Paragliding services Goa
Adventure sports in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: गेल्या कित्येक वर्षांपासून केरी-हरमल पठारावरून हरमल आणि केरी या दोन्ही समुद्र किनाऱ्यांवर बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंग सुरू आहे. यासंदर्भात स्थानिकांनी कोस्टल पोलिसांकडे तक्रारी केल्या; परंतु तात्पुरती कारवाई करत या बेकायदेशीर व्यावसायिकांना अधिकाऱ्यांनीच थारा दिल्याचे सध्या येथील नागरिक बोलत आहेत.

केरी मुख्य रस्त्यावरून पठारावर जाण्यासाठी किमान पाच किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे. या पठारावर जाण्यासाठी तसा पक्का रस्ता नाही. पूर्वी चिरे आणण्यासाठी खटारी बैलगाड्यांचा वापर केला जायचा. त्यानंतर हळूहळू पिकअप त्याच मार्गाने जात होत्या. हा रस्ता दगड-धोंड्यांनी बनलेला आहे. त्याच रस्त्यावरून वाट काढत पॅराग्लायडिंग करण्यासाठी अनेक पर्यटक या पठारावर जायचे.

बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंग करणारे व्यावसायिक आपली जागा निश्चित करून तेथे फलक लावून पर्यटकांकडून एका पॅराग्लायडिंग फेरीसाठी किमान साडेचार हजार रुपये वसूल करायचे. पूर्वी या पठारावर मोठ्या प्रमाणात पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यावसायिकांचे फलक आणि त्यांचे संपर्क नंबर होते. त्यांची जागाही निश्चित केलेली असायची. या परिसरात पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली जायची. या परिसरात बियरच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसायचा.

Paragliding services Goa
Goa Tourism: दोन जीव गमावल्यानंतर गोवा पर्यटन खात्याला जाग; म्हणे, 'केरी पठारावरील पॅराग्लायडिंग अवैध'

हद्दीचा वाद कायम

सरपंच धरती नागोजी म्हणाल्या की, शनिवारी जी घटना घडली, ती पालये पठारावर झाली आहे. ते पठार हरमल आणि पालये पंचायत क्षेत्रात येते; अशा घटना केरी गावात घडलेल्या नाही. पालये आणि हरमल पठारावरून पॅराग्लायडिंगचे उड्डाण होते. त्यानंतर पॅराग्लायडर केरी किनाऱ्यावर फेरफटका मारतात. पॅराग्लायडिंगचे उड्डाण आणि उतरण्यासाठी पालये किंवा हरमल डोंगर पठारावर जावे लागते. त्यामुळे कालची घटना ज्या ठिकाणी घडली तो परिसर केरी पंचायत क्षेत्रात येत नसल्याचा दावा सरपंच धरती नागोजी यांनी केला आहे.

Paragliding services Goa
Goa Paragliding: पायलट हवेत कसरती करतात, त्याच अंगलट येतात; केरीतील दुर्घटनेनंतर व्यावसायिकाचा दावा

...तर ही घटना टळली असती

दोनच दिवसांपूर्वी केरी-तेरेखोल समुद्रकिनारी दोन शॅक व्यावसायिकांना रेस्टॉरंट उभारण्यासाठी त्यांची जमीन मोजमाप करून देण्यासाठी संबंधित खात्याचे अधिकारी आले होते. हे अधिकारी जमिनीचे मोजमाप करत असतानाच या परिसरात किमान दहा पॅराग्लायडर पर्यटकांना घेऊन उड्डाण करत होते. हे दृश्‍य संबंधित खात्याचे अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहत होते. मात्र, संबंधितांवर कारवाई झाली नाही. जर त्याचवेळी कारवाई झाली असती तर शनिवारची दुर्दैवी घटना घडली नसती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com