CM Pramod Sawant And DCM Tejaswi Yadav Dainik Gomantak
गोवा

'भाजपला बिहारचा एवढा द्वेष का'? CM सावंत यांच्या वक्तव्यावरून बिहारमध्ये राजकारण तापले, वाचा कोण काय म्हणाले?

Pramod Yadav

Tejaswi Yadav on CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यूपी आणि बिहारमधील स्थलांतरित मजुरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर बिहारमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे.

'केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यानंतर आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लाजीरवाणे वक्तव्य करून बिहार आणि बिहारी लोकांचा अपमान केला आहे.' असे ट्विट राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केले.

तसेच, 'भाजप आणि भाजप नेते बिहार आणि बिहारी लोकांचा एवढा द्वेष का करतात?' असा सवालही तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी, राज्यातील जवळपास 90 टक्के गुन्हे हे बिहार, उत्तर प्रदेश आणि परराज्यातील स्थलांतरित मजुरांकडून केले जातात. असे वक्तव्य केले होते. त्यानंतर बिहारमधून सावंत यांच्या वक्तव्याबद्दल टीका केली जात आहे.

दरम्यान, याप्रकरणी बिहारच्या पटना न्यायालयात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मनीष सिंह यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

सावंत यांच्या वक्तव्यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत ट्विट करत मुख्यमंत्री सावंत आणि भाजपवर टीका केली याहे.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव?

"केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यानंतर आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लाजीरवाणे वक्तव्य करून बिहार आणि बिहारी लोकांचा अपमान केला आहे. भाजप आणि भाजप नेते बिहार आणि बिहारी लोकांचा द्वेष का करतात? केंद्रातील भाजप सरकार बिहारच्या सर्व हक्क, वाजवी मागण्या आणि हक्कांबाबत नेहमीच नकारात्मक आणि उदासीन का असते?" असे ट्विट तेजस्वी यादव यांनी केले आहे.

जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनीही प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. जेडीयूच्या प्रवक्त्याने याबाबत मंगळवारी एक निवेदन जारी केले. 'एकीकडे भाजप 'एक देश, एक कायदा' बोलतो आणि त्याच पक्षाचे गोव्याचे मुख्यमंत्री यूपी आणि बिहारच्या मजुरांना गुन्हेगार म्हणतात. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विभागाशी संबंधित 'नॅशनल क्राईम ब्युरो'चा डेटा पाहावा. गुजरातमध्ये खोट्या केसेसमध्ये बिहार आणि यूपीच्या लोकांना सर्वाधिक छळले जाते.' असे

तसेच, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बिहार आणि यूपीमधील मजुरांवर केलेल्या वक्तव्यावर जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष उमेश सिंह कुशवाह यांनीही पलटवार करत भाजप सुरुवातीपासूनच उत्तर भारतीयांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये बिहारी मजुरांना तुच्छतेने पाहिले जाते आणि त्यांचे शोषण केले जाते हे सर्वश्रुत आहे. गोव्याचे प्रमोद सावंत यांचे बिहारींबद्दलचे वक्तव्य बिहारी अभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे. या विधानाबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. अशी मागणी कुशवाह यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Borim News: गोव्यासाठी गुड न्यूज! बोरी पुलासाठी भारत सरकारकडून अधिसूचना जारी; लवकरच होणार पायाभरणी

Goa Dengue Cases: मडगावात डेंग्यूचे तुरळक प्रमाणात रुग्ण! तातडीने उपाययोजना केल्याचा परिणाम

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT