Russian Foreign Minister Sergey Lavrov reaches Goa: बाणावली येथे आजपासून शांघाय सहकार्य संघटनेची परिषद (SCO Meet In Goa) सुरू होत आहे. या परिषदेत चीन, पाकिस्तान, रशियासह इतर देशांचे परराष्ट्रमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
SCO बैठकीला हजेरी लावण्यासाठी नुकतेच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव गोव्यात दाखल झाले आहेत. आज सकाळी गोव्यातील दाबोळी विमानतळावर त्यांचे आगमन झाले.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव आपल्या शिष्टमंडळासह गोव्यात दाखल झाले आहेत. सर्जी लावरोव बाणावली येथे 4 ते 5 रोजी होणाऱ्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतील. सकाळी दाबोळी विमानतळावर त्यांचे आगमन झाले.
सर्जी लावरोव विमानतळावर दाखल झाल्यानंतरचा व्हिडिओ समोर आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ प्रसारित केला आहे.
युरेशियन द्वीपसमूहातील देशांमधील परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा आणि समन्वयात्मक सामंजस्य करार करण्याच्या उद्देशाने गेल्या सात वर्षांपासून ही शांघाय कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन सक्रिय आहे.
दरम्यान, चीन आणि रशियाच्या नेतृत्वाखालील युरेशियन सुरक्षा गटामध्ये कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या चार मध्य आशियाई राष्ट्रांचाही समावेश आहे, तर भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये या गटात सामील झाले आहेत. इराण आणि बेलारूस या देशांचा देखील यात समावेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.