Naval War College Goa: नेव्हल हायर कमांड अभ्यासक्रमाचा गोव्यात समारोप, 34 अधिकाऱ्यांना पदवी प्रदान

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आणि अधिकाऱ्यांची चिकाटी आणि व्यावसायिक उत्कृष्टतेबद्दल कौतुक केले.
Naval War College Goa
Naval War College GoaPIB Goa
Published on
Updated on

Naval War College Goa: नौदल युद्ध महाविद्यालयात बुधवारी (दि.04) 35 व्या नेव्हल हायर कमांड अभ्यासक्रमाचा (NHCC) समारोप समारंभ पार पडला. यावेळी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 34 अधिकाऱ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

1 ऑगस्ट 2022 रोजी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये भारतीय नौदलाचे कॅप्टन आणि लष्कर, हवाई दल आणि तटरक्षक दलातील समकक्ष पदांवरील अधिकारी सहभागी झाले.

राष्ट्रीय सुरक्षा, सागरी रणनीती, संयुक्त कारवाया आणि तंत्रज्ञानातील परिवर्तनांवर प्राथमिक लक्ष केंद्रित करून धोरणात्मक आणि ऑपरेशनल (कारवाई) स्तरावरील नेतृत्वासाठी अधिकारी तयार करणे, हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे. राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अभ्यासक्रमादरम्यान, सहभागी अधिकाऱ्यांनी देशासाठी आणि विशेषतः सशस्त्र दलांसाठी धोरणात्मक आणि परिचालनविषयक महत्त्वाच्या विविध विषयांवर संशोधन केले. या अभ्यासक्रमात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये भारतीय नौदलाचे 25 अधिकारी, भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेचे प्रत्येकी चार अधिकारी आणि तटरक्षक दलाच्या एका अधिकाऱ्याचा सहभाग होता.

पदवीधर अधिकारी आता सशस्त्र दलात प्रमुख पदांवर काम करतील आणि धोरण तयार करण्यात तसेच निर्णय घेण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतील.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आणि अधिकाऱ्यांची चिकाटी आणि व्यावसायिक उत्कृष्टतेबद्दल कौतुक केले. भारताच्या संरक्षण दलांमधील शिस्तीचीही त्यांनी प्रशंसा केली.

Naval War College Goa
Goa Board : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 'या' निर्णयामुळे 9 वी, 11 वी नापास विद्यार्थ्यांना मिळणार सुसंधी

कॅप्टन राजीव तिवारी यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी नौदल प्रमुख सुवर्ण पदक आणि द्वितीय क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी कॅप्टन विक्रम आहुजा यांना फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (पश्चिम) रौप्य पदक प्रदान करण्यात आले.

कॅप्टन कुणाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट ऑपरेशन रिसर्च पेपरसाठी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (दक्षिण) रौप्य पदक प्रदान करण्यात आले, तर कॅप्टन वरुण पणीकर आणि कर्नल आरआर लड्ढा यांना द्वितीय क्रमांकाच्या उत्कृष्ट पेपरसाठी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (पूर्व) रौप्य पदक प्रदान करण्यात आले.

Naval War College Goa
SCO Conference: बाणावलीत आजपासून ‘एससीओ’ परिषद

मोस्ट स्पिरीटेड ऑफिसर, या श्रेणीमध्ये, पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या (सेनादल प्रमुख) स्मरणार्थ, नव्याने सुरु करण्यात आलेली जनरल बिपिन रावत ट्रॉफी, कॅप्टन सूरज जेम्स राबेरा यांना या कार्यक्रमात प्रदान करण्यात आली.

प्रमुख पाहुणे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, यांच्यासह व्हाईस ॲडमिरल एमए हम्पीहोली- फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न नेव्हल कमांड, कला हरी कुमार- नेव्ही वेल्फेअर अँड वेलनेस असोसिएशनच्या (NWWA), अध्यक्ष, मधुमती हम्पीहोली- NWWA (दक्षिण क्षेत्र) आणि दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या मुली देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com