CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

सरकार स्थापनेसाठी मगोपची मदत घेणार : मुख्यमंत्री

प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा प्रमोद सावंतांना विश्वास

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, आज मी पंतप्रधान मोदींना भेटलो, निवडणूकीच्या निकालाबाबत चर्चा केली. (Goa CM Pramod Sawant's statement that he will seek the help of MGP to form the government)

ते पुढे म्हणाले, भाजप 20 हून अधिक जागा जिंकणार असल्याची मला खात्री आहे; आम्ही स्वतंत्र आणि प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करू; केंद्रीय नेतृत्व त्यांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करेल, आणि गरज पडल्यास एमजीपीचा पाठिंबा घेण्याची भुमिका त्यांनी स्पष्ट केली.

दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) आणि पंतप्रधान मोदी यांची निवडणुकीनंतरची ही पहिलीच भेट होती, नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि एक्झिट पोलबद्दल दोघांच्यात सविस्तर चर्चा झाली. प्रमोद सावंत आणि पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांची ही भेट राजकारणाला वेगळे वळण देवू शकते.

मुख्यमंत्री सावंत यांचा दावा
2012 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज काँग्रेस (Congress) नेत्यांनी साखळीत प्रचार केला होता. त्यावेळी आपण सात हजार मतांनी निवडून आलो होतो. त्याचप्रमाणे यावेळीही पाच हजार मताधिक्याने ​निवडून येणार, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्यात कॉंग्रेसचे पारडे जड?
देशातील बहुसंख्य माध्यम समूहाने केलेल्या जनमत चाचण्यांच्या आधारे गोव्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या आघाडीला सर्वाधिक 16 ते 18 जागा मिळतील तर भाजपला (BJP) 14 ते 16 जागा मिळतील असे भाकित वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यात 2017 प्रमाणेच त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे अंदाज या चाचण्यांमधून पुढे येत आहे. यामुळे मगोप-तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष (AAP) आणि अपक्षांचे महत्त्व वाढणार असून ते सत्तेत महत्वाची भूमिका बजावणार असा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT