पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींशी माझी ही पहिलीच भेट आहे, नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि एक्झिट पोलबद्दल पंतप्रधानांना माहिती देईन. (Goa BJP party is in touch with certain IND candidates)
तसेच गोव्यात सरकार स्थापनेबाबतही चर्चा करणार; मला विश्वास आहे की गोव्यात पुढील सरकार भाजपच स्थापन करेल आणि माझा पक्ष काही IND उमेदवारांच्या संपर्कात आहे; दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे आशीर्वाद आमच्यावर आहेत; मी आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे.
मंगळवारी सावंत आणि पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांची भेट होणार आहे. याचबरोबर मुख्यमंत्री सावंत आणि गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी 10 तारखेला गोव्याच्या जनतेने कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वच उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. यातच आता साखळीतून निवडणूक लढवलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी आपल्या विजयाचे भाकीत केले आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोवा विधानसभा निवडणुकीत माझा पराभव व्हावा म्हणून सर्व विरोधी पक्षांनी प्रयत्न केले. मात्र, याचा काहीही फायदा होणार नाही. मी साखळीतून पाच हजार मताधिक्याने निवडून येणार.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.