CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mopa To London Flight: मोपा ते लंडन विमानसेवेसाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र, अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सेवा केली होती बंद

Pramod Sawant Goa to London flight: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनजवळील गॅटविक येथील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांना पत्र पाठवले.

Sameer Amunekar

पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनजवळील गॅटविक येथील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांना पत्र पाठवले आहे. सोमवारी विधानसभेत हा विषय उपस्थित झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले होते.

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला पाठवलेल्या ई-मेलची प्रत विधानसभा पटलावर बुधवारी (ता.२३) ठेवली. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर मोपा ते गॅटविक ही विमानसेवा बंद करण्यात आली आहे. लंडनमध्ये गोमंतकीय मोठ्या संख्येने स्थायिक आहेत.

त्यांच्यासाठी ही सेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे विनाविलंब ती सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. त्याची दखल घेत विधानसभेत तो विषय उपस्थित झाल्यानंतर सरकारने त्याची दखल घेतली आहे.

पर्यटन, रोजगार क्षेत्राला फटका

या सेवेस स्थगिती दिल्याने फक्त प्रवाशांनाच नव्हे तर पर्यटन आणि रोजगार क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. थेट विमानसेवेअभावी पर्यटकांना गोव्याकडे येण्यास अडथळा निर्माण झाला आहे, त्यामुळे

केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून ही सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पत्रातून केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT